न्यायाधीशांसोबत वाद, वकिलाला सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 07:41 AM2024-02-06T07:41:04+5:302024-02-06T07:41:21+5:30
एका जमिनीच्या प्रकरणाची सुनावणी असताना पक्षकाराचे वकील पराग तिवारी हे कोर्टात उशिरा पोहोचले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सोमवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशासोबत वकिलाने शाब्दिक वाद घातला. त्यामुळे न्यायाधीशांनी न्यायालय अवमानप्रकरणी ॲड. पराग तिवारी या वकिलाला ८० रुपये दंड किंवा दंड न भरल्यास ५ दिवसांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंड भरण्यास चक्क नकार दिल्याने. तिवारी यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
एका जमिनीच्या प्रकरणाची सुनावणी असताना पक्षकाराचे वकील पराग तिवारी हे कोर्टात उशिरा पोहोचले. यावरून न्यायाधीश अभिजित कुलकर्णी यांनी पक्षकाराला वकील बदलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ॲड. पराग तिवारी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर, न्यायमूर्ती कुलकर्णी व ॲड. तिवारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. जिल्ह्यात पहिल्यांदा असा प्रकार घडला आहे.