गोंदिया जिल्ह्यात कोराना ब्लास्ट : रेकॉर्ड ब्रेक २२९ नवे कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 09:05 PM2020-09-11T21:05:30+5:302020-09-11T21:07:14+5:30

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट होऊन रेकॉर्ड ब्रेक २२९ रुग्ण आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

Corana blast in Gondia district: Record break 229 new corona patients | गोंदिया जिल्ह्यात कोराना ब्लास्ट : रेकॉर्ड ब्रेक २२९ नवे कोरोना रुग्ण

गोंदिया जिल्ह्यात कोराना ब्लास्ट : रेकॉर्ड ब्रेक २२९ नवे कोरोना रुग्ण

Next
ठळक मुद्दे९३ रुग्णांची कोरोनावर मातबाधितांची संख्या पोहोचली २९०८ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया, : कोरोना संसर्गाचा आलेख जिल्ह्यात वेगाने वाढतांना दिसत आहे. आज तर कोरोनाचा ब्लास्ट होऊन रेकॉर्ड ब्रेक २२९ रुग्ण आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर ९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४ रुग्ण हे बाहेर जिल्हा किंवा राज्यातील आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे ३४ वर्षीय रुग्ण राहणार आमगाव यांना लिव्हर व पॅनक्रीयाटायटीसचा त्रास होता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४५ वर्षीय रुग्ण राहणार पुनाटोली (गोंदिया) यांचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे मृत्यू झाला, ४६ वर्षीय रुग्ण राहणार तिरोडा यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे मृत्यू झाला. तर ५९ वर्षीय रुग्ण राहणार तुमसर (भंडारा) यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यांचा गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शक्यता आहे किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी विषाणू प्रयोगशाळेतून किंवा रॅपिड अँटिजेन चाचणीतून करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून २०३५ नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून १०३३ नमुने असे एकूण ३०६८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.

गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १६३ रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-१६५३, तिरोडा तालुका-४३१, गोरेगाव तालुका-१११, आमगाव तालुका-२१२, सालेकसा तालुका-८७, देवरी तालुका-१२६, सडक/अजुर्नी तालुका-९३, अजुर्नी/मोरगाव तालुका-१३७ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-५८ रुग्ण आहे. असे एकूण २९०८ रुग्ण बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यातील ९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: Corana blast in Gondia district: Record break 229 new corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.