कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले! (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:24 AM2021-05-03T04:24:00+5:302021-05-03T04:24:00+5:30
गोंदिया : कोरोना म्हटले की अख्खी दहशतच! जाणारा गेला, मग आपला जीव धोक्यात का घालवायचा, अशी स्वार्थी भावना मनात ...
गोंदिया : कोरोना म्हटले की अख्खी दहशतच! जाणारा गेला, मग आपला जीव धोक्यात का घालवायचा, अशी स्वार्थी भावना मनात बाळगणारे नातेवाईक आपल्या रक्ताच्या नात्यातील लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेच नाहीत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार नातेवाईकांविना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केले आहेत. आतापर्यंत गोंदिया नगर परिषदेने ५३६ कोविड मृतांवर अंत्यसंस्कार केला आहे. परंतु यातील २०० मृतांचे नातेवाईक अत्यंसंस्काराला आलेच नसल्याने नगर पालिकेने हे अंत्यसंस्कार आटोपल्याची माहिती नगर परिषद गोंदियाचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी दिली आहे.
कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पाच नातेवाईकांना पीपीई किट घालून उपस्थित राहण्याची मुभा दिली जाते. परंतु गोंदियातील रुग्णालयात मध्यप्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यातील कोविड रुग्ण असल्याने येथील रुग्ण मृत्यू पावल्यास त्यांच्या अंत्यसंस्काराला मृताचे नातेवाईकही उपस्थित होत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच अंत्यसंस्कार करावे लागते.
................................
गेल्या वर्षभरात कोरोनाने झालेले मृत्यू- ५३९
पालिका कर्मचाऱ्यांनी केलेले अंत्यविधी-५३६
..........................................
५ माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही
कोविड रुग्णाचा मृत्यू झाला तर नातेवाईकांना पार्थिव दिले जात नाही. परंतु त्या मृतावर अंत्यसंस्कार करताना रक्ताच्या नात्यातील पाच जणांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. परंतु कोविडने होणारा मृत्यूदेखील आपल्या जीवावर बेतू शकतो म्हणून अनेक मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्काराला येत नाहीत. या कोविड मृतांच्या नशिबी नातेवाईकांची उपस्थितीही नाही.
......
छत्तीसगड व मध्यप्रदेशातील लोक अंत्यसंस्काराला येत नाहीत
कोविडने मृत पावलेल्या नातेवाईकांच्या अत्यसंस्काराला छत्तीसगड व मध्यप्रदेशातील लोक येत नाहीत. रुग्णाला दाखल केल्यानंतर अनेक लोक गावाला परततात. जो रुग्ण राहीला तो भगवान भरोसे असतो. त्या रुग्णाचा मृत्यू झाला तरी त्याच्या अंत्यसंस्काराला कुणीही हजर राहत नाहीत.
......
९९.९८ टक्के अंत्यसंस्कार नगर परिषद करते
......
प्रतिक्रिया
कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करतांना बहुदा नातेवाईक उपिस्थत नसतात. नातेवाईक येणार यासाठी आम्ही काही काळ प्रतीक्षादेखील करतो. परंतु नातेवाईक येत नसल्यामुळे आम्हालाच तो अंत्यसंस्कार करावा लागतो.
- यादव शेंडे, नगर परिषद कर्मचारी
......
कोरोना मृतांवर अंत्यसंस्काराच्यावेळी पाच नातेवाईकांना परवानगी आहे. त्यातील काही अंत्यसंस्काराला नातेवाईक उपस्थित असतात तर काहीवेळा नातेवाईक उपिस्थत राहात नाहीत. त्यामुळे त्या मृतदेहाची विटंबना होऊ नये म्हणून आम्हाला मिळालेल्या आदेशाच्या आधारे आम्ही अंत्यसंस्कार करतो.
- सचिन भारती, नगर परिषद कर्मचारी