खासगी ट्रॅव्हल्सलाही कोरोनाची भीती, संचारबंदीने ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:22+5:302021-05-19T04:30:22+5:30

गोंदिया : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. ...

Corona also feared private travels, curfews reduced travel rounds | खासगी ट्रॅव्हल्सलाही कोरोनाची भीती, संचारबंदीने ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या घटल्या

खासगी ट्रॅव्हल्सलाही कोरोनाची भीती, संचारबंदीने ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या घटल्या

googlenewsNext

गोंदिया : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. तसा ट्रॅव्हल्स व्यवसायावरही परिणाम झाला असून आता कोरोनामुळे शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या घटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. खासगी ट्रॅव्हल्स सुरू असल्या तरीही त्यांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.

ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करता येतो. तसेच प्रवाशांनाही मास्क बंधनकारक केला आहे. त्यामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. त्याचा फटका ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनाही बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची संख्या रोडावली असून अनेक जण आता प्रवास करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी शहरातून दररोज चारशे ते पाचशे प्रवासी प्रवास करायचे. मात्र आज ही संख्या केवळ शंभर-दीडशेच्या आसपास दिसून येत आहे. त्यातच पूर्वीसारख्या धावणाऱ्या ट्रॅव्हल्स आता मात्र कमी संख्येने धावत आहेत. शहरातून केवळ ४-५ ट्रॅव्हल्स नियमितपणे लावत असल्याची माहिती आहे. ट्रॅव्हल्स मालकांनी लांब पल्ल्यांच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. कोरोना संसर्गापूर्वी जिल्ह्यातील जवळपास २१ ट्रॅव्हल्स लहान-मोठ्या धावत होत्या. मात्र त्यानंतर संचारबंदी लागू केल्यापासून एसटी महामंडळाने आपल्या बसेस बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे अति आवश्यक सेवा तसेच मालवाहतूक वगळता प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मात्र खासगी ट्रॅव्हल्स सुरू असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळत आहे. रायपूर, नागपूर, बालाघाट, लांजी, वाराशिवणी तसेच अन्य मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स तर काही महिन्यांपासून धावत नाहीत. परिणामी ट्रॅव्हल्स व्यवसाय डबघाईला आला असून केवळ मोजक्याच ट्रॅव्हल्स नियमितपणे धावत आहेत. त्यामुळे चालक, क्लीनर, सफाई कामगार व अन्य ऑफिस कर्मचाऱ्यांचा दर महिन्याचा पगार कसा करावा असा प्रश्न ट्रॅव्हल्स मालकांना पडत आहे. त्यातच प्रशासनाने कडक नियम लागू केल्याने दंडात्मक कारवाई होण्याची भीती असल्याने अनेक ट्रॅव्हल्स मालकांनी सावध पवित्रा घेतला असल्याने मोजक्याच ट्रॅव्हल्स आता लॉकडाऊन काळात धावताना दिसून येत आहे.

---------------------------

प्रवाशांना मास्क बंधनकारकच

प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारकच आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमधील प्रवाशांना प्रशासनाने मास्क बंधनकारक केले आहे. यामध्ये अनेक प्रवासी मास्क वापरत आहेत. मात्र तरीही काही प्रवासी मात्र विनामास्क प्रवास करत असल्याचेही दिसून येते. तसेच एका सीटवर एकच प्रवासी व प्रशासनाचे नियमांचे पालन बंधनकारक आहे.

---------------------------

ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

खासगी ट्रॅव्हल्समधून अनेक प्रवासी प्रवास करतात. मात्र यामध्ये कोरोना नियमांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमितपणे होत नसल्याची ओरड आहे. ट्रॅव्हल्सवर कारवाई केली जात नसल्याचे चित्र शहरात अनेकदा दिसून येत आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कोरोना संसर्गात ट्रॅव्हल्सची तपासणी करण्याची गरज आहे.

-------------------------------

ई-पास बंधनकारकच

परजिल्ह्यात प्रवासी वाहतूक करावयाची असल्यास प्रशासनाने ई-पास बंधनकारक केला आहे. तरच प्रवाशांना दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी दिली जाते. यासाठी पोलीस प्रशासन पुढाकार घेत असले तरी खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीची परवानगी मात्र पोलीस विभागाकडे येत नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी आरटीओ व पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याने विशेष लक्ष हवे.

-----------------------

अशी आहे आकडेवारी

रोज शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स- ४

रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स- ४

प्रवाश्यांची एकूण संख्या २५०

Web Title: Corona also feared private travels, curfews reduced travel rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.