कोरोना जनजागृती व मास्कचे वितरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:28+5:302021-05-13T04:29:28+5:30
सडक अर्जुनी : तालुक्यातील बौद्धनगर, फुलेनगर व मोकाशीटोला येथे कार्यरत कर्मचारी वर्ग यांनी लसीकरण जनजागृती व कोविड संबंधित ...
सडक अर्जुनी : तालुक्यातील बौद्धनगर, फुलेनगर व मोकाशीटोला येथे कार्यरत कर्मचारी वर्ग यांनी लसीकरण जनजागृती व कोविड संबंधित ग्राम सर्वेक्षणाचे कार्य करीत असताना गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मुख्याध्यापक, ग्रामसेवक,सरपंच यांनी स्वत:कडून निधी गोळा करुन गावकऱ्यांना १३०० मास्कचे वितरण करण्यात आले.
या दरम्यान गावकऱ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत लसीकरणाबाबत त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. मास्क वितरण व लसीकरण जनजागृती प्रसंगी सरपंच प्रीती सोहनलाल बडोले, उपसरपंच हरी कोसमे, मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, ग्रामसेवक जी. के.रामटेके, मुख्याध्यापक एम.बी.ब्राह्मणकर, मुख्याध्यापक राजू कोटांगले, विपेंद्र बडोले, सूूर्यभान ठलाल, पौर्णिमा बडोले, विना तोरणकर, समता झिंगरे, सुशीला बडोले, रुपा बनकर,रंजना बडोले, रेखा झिंगरे, इंदू बनकर, दिलीप वंजारी,अमोल राऊत ,राधा भोंडे, विजया मेश्राम, शुभांगी रामटेके उपस्थित होते.