कोरोना ब्लास्ट, सहा दिवसात ८२१ क्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:23+5:30

रविवारी (दि.६) जिल्ह्यात एकूण १२१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यात सर्वाधिक ८१ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. तर गोंदिया, गोरेगाव आणि बालाघाट येथील प्रत्येकी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. गोंदिया शहरात मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सरासरी ७० रुग्ण दररोज निघत असल्याने शहरात कोरोनाच्या समूह संसर्गला तर सुरूवात झाली नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Corona blast, 821 crosses in six days | कोरोना ब्लास्ट, सहा दिवसात ८२१ क्रास

कोरोना ब्लास्ट, सहा दिवसात ८२१ क्रास

Next
ठळक मुद्दे६ दिवसात ११ जणांचा मृत्यू : ११७७ कोरोना बाधितांची मात : रुग्ण वाढीचा दर झाला चौपट, काळजी घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हावासायांसाठी ऑगस्ट महिना कोरोना उद्रेकाचा ठरला. ऑगस्ट महिन्यात तब्बल ११६९ कोरोना बाधितांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने १ ते ६ सप्टेंबर दरम्यान तब्बल ८२१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून ११ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना वाढीचा वेग चौपट झाला असून नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
रविवारी (दि.६) जिल्ह्यात एकूण १२१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यात सर्वाधिक ८१ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. तर गोंदिया, गोरेगाव आणि बालाघाट येथील प्रत्येकी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. गोंदिया शहरात मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सरासरी ७० रुग्ण दररोज निघत असल्याने शहरात कोरोनाच्या समूह संसर्गला तर सुरूवात झाली नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण २२८९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १२७६ कोरोना बाधित रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातच गोंदिया शहरातील रुग्ण संख्येत वेगाने वाढ झाली आहे. २३ आॅगस्टपासून रुग्ण वाढीचा वेग चौपट झाला असून त्यात सातत्याने वाढच होत असल्याने कोरोना ब्लास्ट कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११८६ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८९.६९ होता.
मात्र ऑगस्ट महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातताने वाढ होत असल्याने आता हा दर ५१.५२ वर आला आहे. त्यामुळे ही बाब सुध्दा जिल्हावासीयांसाठी चिंताजनक आहे. जिल्ह्यात मार्च ते जुलैपर्यंत कोरोना बळींची संख्या ही सहा होती. तर आॅगस्ट महिन्यात १६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. १ ते ६ सप्टेंबरपर्यंत ११ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ही बाब निश्चितच जिल्हावासीयांसाठी चिंता वाढविणारी आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या आणि मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत असल्याने ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी सुध्दा मंथन करणारी आहे.

चाचण्यांच्या तुलनेत रुग्णांची टक्केवारी ८.६६
जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्यानंतर संशयीत रुग्णांच्या कोरोना चाचण्यांना सुरूवात झाली आहे.५ सप्टेंबरपर्यंत एकूण १९ हजार २९९६ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.यात २२८९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.उर्वरित रुग्ण हे कोरोना निगेटिव्ह आले आहे. झालेल्या एकूण तपासणी चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांची टक्केवारी ही ८.६६ टक्के आहे.

जिल्ह्यात सहा महिन्यात कोरोनाने २२ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात मार्च ते मे महिन्यात कोरोनाने एकही मृत्यू झाला नव्हता. जून महिन्यात १, जुलै ५, आॅगस्टमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाने अकरा जणांचा मृत्यू झाला.

असा वाढला जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ
जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. त्यानंतर मे मध्ये ६४, जून ८४, जुलै १४४, ऑगस्ट ११६९ आणि ६ सप्टेंबरपर्यंत ८१६ कोरोना बाधित आढळले आहे. या महिन्यातील अजून २४ दिवस शिल्लक असून कोरोना रुग्ण वाढीचा वेग पाहता या महिन्यात कोरोना बाधितांचा नवा रेकार्ड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Corona blast, 821 crosses in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.