गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोना स्फोट; २५९ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:37 PM2020-09-14T21:37:38+5:302020-09-14T21:38:04+5:30
गोंदिया : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सोमवारी पुन्हा स्फोट झाला असून २५९ नवीन रूग्णांची भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शुक्रवारी (दि.११) २२९ रूग्ण आढळून आल्यानंतर सोमवारी (दि.१४) पुन्हा स्फोट झाला असून २५९ नवीन रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता कोरोना रूग्ण संख्या ३४१६ झाली आहे. सोमवारी ६० रूग्ण कोरोनावर मात करून घरी गेले असून आतापर्यंत १७७८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे १५८८ क्रियाशील रूग्ण जिल्ह्यात आहेत. तर सोमवारी २ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी जिल्ह्यात आढळून आलेल्या २५९ कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक १९४ रुग्ण आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात १९९८, तिरोडा तालुक्यात ४८८, गोरेगाव तालुक्यात १२५, आमगाव तालुक्यात २३८, सालेकसा तालुक्यात १००, देवरी तालुक्यात १४६, सडक-अर्जुनी तालुक्यात १०७, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४६ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले ६९ रुग्ण असून एकूण ३४१७ रुग्ण बाधित आढळले आहे.
तर ज्या ६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४५, तिरोडा तालुक्यातील २, आमगाव तालुक्यातील ६, देवरी तालुक्यातील ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ व सडक-अर्जुनी येथील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत १७७८ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ९७७, तिरोडा तालुक्यातील ३११, गोरेगाव तालुक्यातील ५२, आमगाव तालुक्यातील १३१, सालेकसा तालुक्यातील ५७, देवरी तालुक्यातील ६५, सडक-अर्जुनी तालुक्यातील ७३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १०५ आणि इतर ७ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १५८८ झाली आहे. त्यापैकी १५७५ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात व १३ रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहेत.
४०१ रूग्ण घरीच अलगीकरणात
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ४०१ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात ३६८, तिरोडा तालुक्यात १०, गोरेगाव तालुक्यात ००, आमगाव तालुक्यात ६, सालेकसा तालुक्यात ३, देवरी तालुक्यात १, सडक-अर्जुनी तालुक्यात ३, अर्जुनी- मोरगाव तालुक्यात १० व इतर ०० असे एकूण ४०१ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
जिल्ह्यात ५१ रूग्णांचा मृत्यू
जिल्हयात आतापर्यंत ५१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुक्यात २६, तिरोडा तालुक्यात १०, गोरेगाव तालुक्यात १, आमगाव तालुक्यात ५, सालेकसा तालुक्यात १, सडक -अर्जुनी तालुक्यात ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १ व इतर ठिकाणच्या ४ रुग्णांचा समावेश आहे.