कोरोना बाधितांचे प्रमाण घटले; पॉझिटिव्हिटी रेट डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 05:57 PM2022-02-08T17:57:36+5:302022-02-08T18:06:59+5:30
मंगळवारी जिल्ह्यातील ४३ बाधितांनी कोरोनावर मात केली तर २८ बाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५८६ वर आला.
गोंदिया : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट ९.२ टक्क्यांवर आला आहे. मंगळवारी (दि.८) जिल्ह्यातील ४३ बाधितांनी कोरोनावर मात केली तर २८ बाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५८६ वर आला.
कोरोना बाधितांपेक्षा मात मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिलासादायक चित्र जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी २६२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ९० नमुन्यांची आरटीपीसीआर तर १७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात २८ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १०.६८ टक्के आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच चाचण्या करणाऱ्यांचे प्रमाण सुध्दा कमी होत आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ५०४३४१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २६९७४४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २३४५९७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४५९९२ नमुने कोरोना बाधित आढळले. तर ४४६८४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ९.२ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ५८६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी ५५५ रुग्ण गृहविलगीकरणात आहे.
रुग्ण वाढीचा दर : ११.६ दिवस
रुग्ण बरे होण्याचा दर : ९७.४ टक्के
मृत्यू दर : १.२७ टक्के
पॉझिटिव्हिटी रेट : ९.२ टक्के
लसीकरणाची स्थिती
पहिला डोस : १०२६८१० : ९३.६२ टक्के
दुसरा डोस : ७६९५५३ : ७०.१६ टक्के
१५ ते १७ वयोगट : ३८३३२ : ६६.८१ टक्के
बूस्टर डोस : ७३८४