कोरोना 10,000 पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 05:00 AM2020-11-05T05:00:00+5:302020-11-05T05:00:12+5:30
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत होती. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा या दोनच महिन्यात ७५०० वर पोहचला. मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला . तब्बल नऊ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १० हजार ७७ कोरोना बाधितांची नोंद झाली. पण मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख पुन्हा उंचावत असल्याचे चित्र आहे.
n लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यात काेरोनाचा शिरकाव झाला. सुरूवातीला केवळ एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर दीड महिने जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र मे महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा आलेख वाढण्यास सुरूवात झाली. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत तब्बल १००७७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. कोरोना बाधितांचा आकडा बुधवारी (दि.४) १० हजारांच्या पार झाला. तर ११६ नवीन कोरोना बाधितांची त्यात पुन्हा भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही अशी चिंता जिल्हावासीयांना सतावून लागली आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत होती. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा या दोनच महिन्यात ७५०० वर पोहचला. मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला . तब्बल नऊ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १० हजार ७७ कोरोना बाधितांची नोंद झाली. पण मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख पुन्हा उंचावत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी ११६ नवीन कोरोना बाधित आढळले तर ३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर गोंदिया येथील ६८ वर्षीय रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवारी आढळलेल्या ११६ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ६२ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १४, आमगाव १३, सालेकसा ४, देवरी ३, सडक अर्जुनी ७, अर्जुनी मोरगाव १० आणि बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ३९३३६ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी २९९५५ नमुने निगेटिव्ह आले. ६८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.
कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातर्गंत ३९०९३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ३५१८७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १००७७ कोरोना बाधित आढळले असून यापैक ९१८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या स्थितीत ७५९ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहेत.
रुग्ण बरे होण्याचा दर ९०.११ टक्के
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख उंचावत असला तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सुध्दा अधिक आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.११ टक्के आहे. तर रुग्ण वाढीचा डब्लिंग रेट १११ दिवस आहे. तर मृत्यू दर १.१७ टक्के आहे.