जिल्ह्यात कोरोना ११००० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 05:00 AM2020-11-19T05:00:00+5:302020-11-19T05:00:14+5:30
बुधवारी (दि.१८) जिल्ह्यात ९८ नवीन कोरोना बाधितांची भर पडली तर ८१ कोरोना बाधितांनी कोरोनावर केली. बुधवारी आढळलेल्या ९८ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ६८ कोरोना बाधित रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६, आमगाव ५, देवरी १, सडक अर्जुनी १४ व बाहेरील राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोनाचा ग्राफ वाढत गेला. ९ महिन्याच्या कालावधीत कोरोनाचा ग्राफ कधी खाली तर कधी वर होत गेला. सुरुवातीला एक असलेली रुग्ण ९ महिन्यांच्या कालावधीत ११ हजारावर पाेहचली आहे. दिवाळीनंतर पुन्हा कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत थोडी भर पडली आहे.
बुधवारी (दि.१८) जिल्ह्यात ९८ नवीन कोरोना बाधितांची भर पडली तर ८१ कोरोना बाधितांनी कोरोनावर केली. बुधवारी आढळलेल्या ९८ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ६८ कोरोना बाधित रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६, आमगाव ५, देवरी १, सडक अर्जुनी १४ व बाहेरील राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४१९२० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ३१९२९ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. याच अनुषंगाने ४४६४५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४००५७ नमुने निगेटिव्ह आले.
जिल्ह्यात आतापर्यंत ११०१८ काेरोना बाधित आढळले असून यापैकी १०२६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत ६०७ कोरोना ॲक्टीव रुग्ण आहेत.
मागील दोन दिवसांपासून पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.