कोरोनामुक्त अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:29 AM2021-09-03T04:29:39+5:302021-09-03T04:29:39+5:30
गोंदिया : मागील महिनाभरापासून कोरोनामुक्त असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे ...
गोंदिया : मागील महिनाभरापासून कोरोनामुक्त असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याचे चित्र असून, जिल्हावासीयांना काळजी घेण्याची गरज आहे. गुरुवारी (दि. २) जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांची नोंद झाली.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने २६८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २४० नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी दोन नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.७५ टक्के होता. मागील दोन महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. आठपैकी सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले होते. मात्र कोरोनामुक्त असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे काेरोनामुक्त तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४,४७,३१४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २,२७,९९४ नमुन्यांनी आरटीपीसीआर, तर २,१९,३२० नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१,२०४ नमुने कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४०,४९६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत चार कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
............
लसीकरणाची आठ लाखांच्या दिशेने वाटचाल
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७,८४,३६० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ६,०२,९०६ नागरिकांना पहिला, तर १,८१,४५४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
..........