ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:08+5:302021-04-20T04:30:08+5:30
केशोरी : ग्रामीण भागातील नागरिकांना वाटत होते की, आम्हाला कोरोना होत नाही, मास्क लावणाऱ्यांना आणि शहरात राहणाऱ्यांनाच कोरोना होतो, ...
केशोरी : ग्रामीण भागातील नागरिकांना वाटत होते की, आम्हाला कोरोना होत नाही, मास्क लावणाऱ्यांना आणि शहरात राहणाऱ्यांनाच कोरोना होतो, अशी त्यांची धारणा होती. मास्क लावणाऱ्यांची टिंगल केली जात होती. हाच प्रकार ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या अंगलट आला आहे. कोरोना विषाणू सारख्या महामारीला हलक्यात घेतल्यामुळे ग्रामीण भागातच कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. ह्याला ग्रामीण भागातील नागरिक जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत फक्त शहरातच कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. कोरोनाच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तोंडावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम शासनाने घालून दिले होते. काही समजदार नागरिक या नियमांचे पालन करून आपली दैनंदिन कामे करत होती. त्यांना ग्रामीण भागातील नागरिक हसून टिंगल करीत असत. कोरोना यांनाच होतो आम्हाला होत नाही. आता परिस्थिती तशीच झाली कोरोना शहरापेक्षा गावखेड्यात कोरोनाचा संसर्ग वाढून परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३४ गावे येतात प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण केशोरी कनेरी येथे अधिक रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढून आरोग्य कर्मचारी कमी पडत आहेत. असे असतानाही नियमित कोरोना तपासणी, औषधोपचार आणि लसीकरण सुरू आहे. नागरिकांना हे समजणे गरजेचे आहे की, आपले आरोग्य आपल्याच हातात आहे. कोणीही घराबाहेर पडू नये, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घरी राहून घ्यावी. त्याशिवाय कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटणार नाही.