गोंदिया जिल्ह्यात झपाट्याने वाढतोय कोरोनाचा संसर्ग; रुग्णसंख्या २९० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:07 PM2020-08-14T12:07:51+5:302020-08-14T12:10:22+5:30
१ ते १४ ऑगस्ट दरम्यान गोंदिया जिल्ह्यात ५०० हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) आणखी ३७ कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना रुग्णांचा आकडा २९० वर पोहचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र असून १ ते १४ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ५०० हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) आणखी ३७ कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना रुग्णांचा आकडा २९० वर पोहचला आहे. तर ९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४३७ वर पोहचली आहे.
शुक्रवारी आढळलेल्या ३७ कोरोना बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील १४, सालेकसा ४, सडक ३, तिरोडा १२, आमगाव १ आणि अजुर्नी मोरगाव तालुक्यातील २ कोरोना बाधितांचा समावेश आहे.मागील दहा ते बारा दिवसांपासून गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे. कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या समूह संसगार्ची तर सुरूवात झाली नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. विेशेष म्हणजे शहरी भागासह आता ग्रामीण भागात कोरोना बाधित अधिक रुग्ण आढळत असल्याने प्रशासनासह जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ आहे. तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासन पूर्णपण अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन केंद्रात सुध्दा योग्य सोयी सुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे या गोष्टी सुध्दा कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.
गोंदिया व तिरोडा कोरोनाचे हॉटस्पॉट
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे तिरोडा व गोंदिया तालुक्यात आढळले. या दोन्ही तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दोनशेच्यावर गेली आहे. तर दररोज या दोन्ही तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे.
आरोग्य विभागाचा गाडा प्रभारीवरच
कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. तर आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार दररोज पुढे येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यातील आरोग्याचा विभागाचा गाडा सध्या प्रभारींच्या भरोश्यावर सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा भार प्रभारींच्या भरोश्यावर सुरू आहे. तर कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा प्रशासनाने ५ जिल्हा शल्यचिकित्सक बदलले. त्यामुळे आरोग्य विभागाची अवस्था काय कशी दुबळी झाली हे दिसून येते.
नागरिकांनो संसर्ग वाढतोय काळजी घ्या
मागील दहा बारा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वाºयावर सोडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:ची काळजी स्वत:च घेण्याची गरज आहे. नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंगचे आणि आरोग्य विभागाने दिलेल्या निदेर्शांचे काटेकोरपणे पालन करा. अत्यावशक काम असेल तरच घराबाहेर पडा, आपल्या समोरचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे समजून स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.