सिरेगावबांध येथे ११० नागरिकांची कोरोना तपासणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:30 AM2021-03-16T04:30:12+5:302021-03-16T04:30:12+5:30
या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी डोंगरवार, डॉ. नाकाडे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी ...
या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी डोंगरवार, डॉ. नाकाडे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी सिरेगावबांध येथे नागरिकांची आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली आहे. यात ९९ आरटीपीसीआर व ११ रॅपिड अँटिजेन अशा प्रकारे ११० नागरिकांची तपासणी करण्यात आली. कोरोना तपासणीसाठी डॉ. कुलकर्णी यांच्यासह डॉ. नाकाडे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. काळे, परिचारिका काटवले, खराबे, संजू मेश्राम, वाहक उरकुडे यांनी सहकार्य केले. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत दर महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटी येथे कोरोना लसीकरणासाठी ६० वर्षांवरील वयोवृद्ध व ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील आजारी असलेल्या लोकांनी आपले नाव ग्रामपंचायत येथे नोंदवावे. कोरोना चाचणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन वेळोवेळी आपले नाव नोंदवावे. तसेच वेळोवेळी गावोगावी जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कोरोनाची चाचणी केली जात असल्याची माहिती डॉ. श्वेता कुलकर्णी यांनी दिली.