कोरोना नियम मोडणाऱ्या नागरिक व व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:40+5:302021-05-07T04:30:40+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नका, वेळेच्या आतच दुकाने सुरू ठेवा, असे गोंदियाचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश ...
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नका, वेळेच्या आतच दुकाने सुरू ठेवा, असे गोंदियाचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असतानाही त्यांच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या लोकांवर १२ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५ मे रोजी दुपारी २.१५ वाजता रावणवाडीच्या त्रिमूर्ती चौकात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस शिपाई विक्की जयशंकर दगडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिरसोला येथे ५ मे रोजी दुपारी १२.१० वाजता कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पोलीस शिपाई शेखर पुरणलाल पटले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तिसरी व चाैथी कारवाई रावणवाडीच्या त्रिमूर्ती चौकात करण्यात आली. कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पोलीस शिपाई दुर्गेश बिसेन यांनी तक्रार केली. पाचवी व सहावी कारवाई आमगाव पोलिसांनी केली आहे. आमगावच्या गांधी चौकात ५ मे रोजी दुपारी २.५० वाजता एका चप्पल विक्री करणाऱ्या दुकानात गर्दी केली होती. महिला पोलीस शिपाई सुषमा बोंबार्डे व पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे यांनी तक्रार केली आहे. सातवी कारवाई गांधी चौक आमगाव येथील हार्डवेअर दुकानात सामान विकी करणाऱ्या व्यावसायिकाविरोधात सहाय्यक फौजदार अरुण ब्राह्मणकर यांनी तक्रार केली आहे. आठवी कारवाई गांधी चौक आमगाव येथे चप्पल विक्री करणाऱ्या दुकानदारावर पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे यांनी केली आहे. नववी कारवाई गांधी चौक आमगाव येथील चप्पल विक्री दुकानदारावर पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे यांनी केली आहे. दहावी, अकरावी व बारावी कारवाई रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या घिवारी येथे करण्यात आली. कोरोना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले नियमांचे उल्लंघन जात होते. १३वा गुन्हा देवरी पोलीस ठाण्यांतर्गत आहे. ५ मे रोजी दुपारी १२ वाजता देवरीच्या चिंचगड रोडवर विनामास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचा पालन न करत कोरोना नियम मोडले. पोलीस हवालदार झिंगू मडावी यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम १८८, सहकलम २, ३, ४ साथरोग प्रतिबंध कायदा सहकलम ५१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.