कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:08+5:302021-03-04T04:56:08+5:30
नरेश रहिले गोंदिया : व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेम प्रकरणे ...
नरेश रहिले
गोंदिया : व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेम प्रकरणे व अनैतिक संबंध यातून पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. मागील दोन वर्षांत पती-पत्नीत झालेला वाद हा पोलिसांपर्यंत पोहोचला. मागील, दोन वर्षांत ६७२ तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे पोहोचल्या. सन २०१९ मध्ये ३२६ तक्रारी, तर सन २०२० मध्ये २९१ तक्रारी, तर सन २०२१ च्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत ५५ तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींपैकी २५७ प्रकरणांत महिलांच्या भरोसा सेलने पती-पत्नीत समेट घडवून आणला आणि त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला. सन २०१९ मध्ये आलेल्या ३२६ तक्रारींपैकी १४८ प्रकरणांत समेट घडविला. सन २०२० या वर्षात २९१ तक्रारींपैकी १०० प्रकरणांत समेट घडवून आणले. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या वर्षातील ५५ तक्रारींपैकी ९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्याला महत्त्वाचे कारण मोबाइल होते.
बॉक्स
नोकरी गेली म्हणून पैशापेक्षा चारित्र्याचे टेन्शन
पतीची असलेली व्यसनाधीनता, पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणार संशय हा घराची शांती भंग करण्यास कारणीभूत होत असतो. यातून पती-पत्नीत क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून होणारे वाद विकोपाला जातात. त्यातून परिस्थिती हाताबाहेर जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत जात आहे. महिला किंवा पुरुषांकडून मोबाइलचा अतिवापर किंवा सोशल मीडियावर टाकलेली धूम ही सर्व कारणे पत्नी-पत्नीच्या संसाराला ग्रहण लागण्याची दिसून आली.
बॉक्स
२५७ प्रकरणांत मध्यस्थी
गोंदिया जिल्ह्याची २६ महिन्यांची परिस्थिती पाहता सन २०१९ मध्ये आलेल्या पती-पत्नीच्या १४८ प्रकरणांत मध्यस्थी केली. सन २०२० या वर्षात १०० प्रकरणांत मध्यस्थी केली. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या वर्षातील ९ प्रकरणांत मध्यस्थी करण्यात आली. महिला सेलच्या मध्यस्थीमुळे पती-पत्नीचा वाद मिटला. रडत आलेल्या महिला भरोसा सेलमुळे हसत पतीसोबत घरी परतल्या.
बॉक्स
आलेल्या तक्रारी
२०१९ मध्ये नोंदविलेली प्रकरणे-३२६
२०२० मध्ये नोंदविलेली प्रकरणे-२९१
२०२१ मध्ये नोंदविलेली प्रकरणे-५५