गुढरीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:24+5:302021-03-20T04:27:24+5:30

नवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम गुढरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, तालुक्यात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. यातूनच ...

Corona positive found in the gut | गुढरीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह

गुढरीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह

Next

नवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम गुढरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, तालुक्यात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. यातूनच गुढरी गावातील नागरिकांची कोरोना तपासणी गुरुवारी करण्यात आली.

चान्ना-बाकटी येतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता डोंगरवार, डॉ. नाकाडे, परिचारिका खराबे, काटवले, नंदेश्वर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शहारे यांनी ही तपासणी केली. जिल्ह्यासोबतच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातही कोरोना हळूहळू पाय पसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-बाकटी येथे कोरोनाची तपासणी नियमित करण्यात येत आहे. येथे नि:शुल्क तपासणी केली जात असून, सोबतच कोरोना प्रतिबंधक लसीकरणदेखील सुरू झाले आहे. ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ६९ वर्षे वयांतील जोखीम असलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध घालता येईल व नागरिकांना आपले आरोग्य सुरक्षित करता येईल, अशी माहिती डॉ. डोंगरवार यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क होऊन कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, हात वारंवार साबणाने धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे या गोष्टीकडे लक्ष देण्याचे डॉ. डोंगरवार यांनी कळविले आहे.

Web Title: Corona positive found in the gut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.