कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:30 AM2021-04-01T04:30:08+5:302021-04-01T04:30:08+5:30
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कोरोना प्रतिबंधात्मक ...
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि निर्बंधांमध्ये १५ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. नवीन निर्बंधानुसार मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपयांचा दंड आकाराला जाणार आहे. तसेच पूर्वीचे निर्बंधसुध्दा कायम असणार आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून त्याला प्रतिबंध लावण्यासाठी प्रशासनातर्फे विविध प्रतिबंध लावण्यात आले आहे. रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत जमावबंदी लागू केली असून ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याअंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक उपयायोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाला तो कुठल्या डॉक्टरांकडेे उपचार घेत आहे याची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे. कोरोनाची नवीन नियमावली १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे. साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केली आहे. तसेच या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाणार आहे.