बाम्हणी येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:21+5:302021-06-17T04:20:21+5:30
गोरेगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत बाम्हणी येथे मंगळवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ११० ...
गोरेगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत बाम्हणी येथे मंगळवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ११० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार बाम्हणी येथे ४० व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार होते. परंतु नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादानुसार एकूण ११० लोकांना लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा यांच्या सहकार्याने अतिरिक्त ७० लसीचा पुरवठा करण्यात आला. आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा व गावातील लसीकरण शिबिरातृून ४५ ते ६० वर्षे वयोगटातील एकूण ५०४ पैकी २१२ लोकांना लस देण्यात आली. ६० वर्षे वयोगटातील एकूण १५७ पैकी १०३ जणांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सरपंच गीता बिसेन, ग्रामसेवक पी. बी. टेंभरे यांनी सहकार्य केले. खंडविकास अधिकारी झेड. डी. टेंभरे व गटशिक्षणाधिकारी एन. जे. शिरसाटे यांनी भेट देऊन लसीकरणाबाबत समाधान व्यक्त केले.
लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी उपसरपंच बालाराम पटले, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर गौतम, सुखदेव कटरे, ओंकार कावळे, नीता कावळे, सुशीला कटरे , सरिता भलावी, अनिता भीमटे, भाग्यश्री कावळे, मुख्याध्यापक जी.ई.येळे, पदवीधर शिक्षक उत्तम टेंभरे, सहाय्यक शिक्षक हिवराज धपाडे, चिंतामण वलथरे, अंगणवाडी सेविका गीता शरणागत, कुलवंता कटरे, मदतनीस जीवनकला बिसेन, आशा सेविका मुनेश्वरी कटरे, शामकला कटरे, परिचर तारा परसमोडे, कमल परसमोडे, रोजगार सेवक मुनेश्वर कटरे यांनी सहकार्य केले.