न.प.मध्ये कोरोना आढावा बैठक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:20+5:302021-04-11T04:28:20+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गोंदिया जिल्हा देखील प्रभावित झाला असून सडक-अर्जुनीमध्ये आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गोंदिया जिल्हा देखील प्रभावित झाला असून सडक-अर्जुनीमध्ये आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आल्याचे मुख्याधिकारी मेश्राम यांनी सांगितले. तसेच कोरोना व्हायरस रोखण्याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याविषयी नियोजन करावे, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना देखील नगरपंचायत क्षेत्रात सुरु करता येईल का याविषयी देखील चांगल्या नियोजनाची गरज आहे असे आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे औचित्य साधून नगरपंचायतचा स्व. उत्पन्न निधी अंतर्गत दिव्यांगांना पाच टक्के निधी वितरण योजनेंतर्गत दिव्यांगांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांना देखील प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नगरपंचायतद्वारे घेण्यात आलेल्या दोन कचरा गाड्यांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन परसराम सूर्यवंशी यांनी तर प्रास्ताविक मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांनी केले. यावेळी नगरपंचायतचे कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.