जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:31 AM2021-09-25T04:31:14+5:302021-09-25T04:31:14+5:30

गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. शुक्रवारी (दि.२४) बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती. ...

Corona under control in the district! | जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात !

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात !

Next

गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. शुक्रवारी (दि.२४) बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ वर स्थिर होती.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी ४४८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ३८५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एकही नमुना कोराेना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४५३०८३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २३२४०१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २२०६८२ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२२० नमुने कोरोनाबाधित आढळले. तर ४०५०६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत गोंदिया तालुक्यात ४, तर आमगाव तालुक्यात ३ कोरोना ॲक्टिव्ह आहेत.

...........

लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पूर्ण

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वाचे शस्त्र आहे. त्यामुळेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर शासन आणि प्रशासनाकडून भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ८९०८ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ७२२५७४ नागरिकांना पहिला तर २८६३३४ नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला आहे.

Web Title: Corona under control in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.