कोरोना लसीकरण जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:33+5:302021-05-10T04:28:33+5:30
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कृतीदल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार १८ ते ४५ वर्षे ...
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कृतीदल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार १८ ते ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तिंना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे .सर्वांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेत निसंकोचपणे लस घ्यावी, असे समाजसेवक संजय रहांगडाले यांनी यावेळी सांगितले. वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवणे यावर मार्गदर्शन करण्यात आले. लसीकरण जनजागृतीबाबत गावात पोस्टर लावण्यात आले. या जनजागृती मोहिमेत लय, ताल, कृतीच्या माध्यमाने लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
प्रत्येक घरी गृहभेटी देऊन लसीकरणाचे महत्व सांगितले. याप्रसंगी उपसरपंच पटले कमल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई रहांगडाले, शिल बिसेन, अजय सदरे, प्रशांत गौतम, विलास डोंगरे, सुजित पवार, नंदेश्वर, संजय मडावी, ग्रामसेवक, अंगणवाडी व आशा सेविका आदींची उपस्थिती होती.