प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:30 AM2021-03-10T04:30:02+5:302021-03-10T04:30:02+5:30
या लसीकरणासाठी कोविन ॲपवर नाव नोंदणी करून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतु गोरगरीब व शेतमजुरांना कोविन ॲपद्वारे नोंदणी ...
या लसीकरणासाठी कोविन ॲपवर नाव नोंदणी करून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतु गोरगरीब व शेतमजुरांना कोविन ॲपद्वारे नोंदणी करावी लागते, हेच माहिती नसल्यामुळे लसीकरिता उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची कमतरता दिसून आली. ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोविन ॲपची कल्पना नाही, त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे डॉ. पिंकू मंडल व डॉ. राकेश पेशने यांनी सांगितले. कोणतेही ज्येष्ठ नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. केंद्र शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत लसीकरण सुरू असून, गावातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. मंडल आणि डॉ. पेशने यांनी केले आहे. लसीकरण तालुका वैद्यकीय अधिकारी विजय राऊत आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडल यांच्या मार्गदर्शनात डॉ. पेशने, आरोग्य पर्यवेक्षिका राखी घाडगे व पथक यशस्वीरित्या पार पाडत आहेत.