कोरोना योद्धा पोलीस पाटलांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:26 AM2021-02-14T04:26:43+5:302021-02-14T04:26:43+5:30
आमगाव : कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता, कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून उत्कृष्ट काम ...
आमगाव : कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता, कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या १० पोलीस पाटलांना गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते ‘कोरोना योद्धा’ म्हणून गौरविण्यात आले.
पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सालेसाचे पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले, गोरेगावचे पोलीस निरीक्षक दीपक वंजारी उपस्थित होते. कार्यक्रमात आमगावच्या पोलीस पाटील नर्मदा चुटे, दहेगावच्या पोलीस पाटील खेमेश्वरी बोळणे, फुक्कीमेटाच्या देवेश्वरी पारधी, बनगावचे संजय हत्तीमारे, रिसामाचे लोकचंद भांडारकर, पाऊलदौनाचे राजेश बन्सोड, किडंगीपारचे देवेंद्र भांडारकर, डोंगरगावचे प्रेमलाल टेंभरे, मानेगावचे संजय पुंड, बोरकन्हारचे तिलक कटरे यांचा पोलीस उपमहानिरीक्षक पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक विजय रहांगडाले, प्रतिभा पठाडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते.