कोरोना योद्ध्यांचा केला सत्कार (महिला)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:34+5:302021-03-13T04:53:34+5:30

देवरी : जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना जिल्हा महिला आघाडीकडून कोरोना काळातील महिला योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला ...

Corona Warriors felicitated (Women) | कोरोना योद्ध्यांचा केला सत्कार (महिला)

कोरोना योद्ध्यांचा केला सत्कार (महिला)

Next

देवरी : जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना जिल्हा महिला आघाडीकडून कोरोना काळातील महिला योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनंदा भुरे होत्या. के. एस. जैन विद्यालयाच्या प्राचार्य रजिया बेग, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक करुणा कुर्वे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता बोरुडे, शिवसेना जिल्हा उपसंघटक माया शिवनकर, तालुकाप्रमुख सुनील मिश्रा, शहरप्रमुख राजा भाटिया, आमगाव-देवरी विधानसभा संघटक राजिक खान यावेळी उपस्थित होते. प्रा. सुनंदा भुरे यांनी लिहिता, वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे तर जे आपण लिहिलं आणि वाचलं ते जीवनात अंमलात आणणं हे खऱ्या अर्थाने शिक्षण होय, असे मत व्यक्त केले. तर नायडू यांनी या कार्यालयातून महिलांच्या समस्या सोडविण्याचा आणि महिलांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्न केला जाईल तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. या कार्यक्रमात आरोग्यसेविका पुष्पा नळपते, अंगणवाडी शिक्षिका वर्षा कावळे, अंगणवाडी सेविका शिवकांता चव्हाण, आशा सेविका ललिता पटले, पोलीस कर्मचारी प्रतिमा लेदे यांचा शिवसेना महिला जिल्हा आघाडीकडून साडी देऊन सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन शुभांगी ढोमणे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रीती उईके, प्रीती नेवरगडे, प्रीती नेताम, सलमा राऊत, अनिल कुर्वे, सुभाष दुबे, दालचंद मडावी, महेश फुन्ने, क्रिष्णा राखडे, दिनदयाल मेश्राम, विलास राऊत, गणेश चंदेल, राजा गुप्ता, राजा मिश्रा, परवेज पठाण आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सहकार्य केले.

Web Title: Corona Warriors felicitated (Women)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.