कोरोनाने पुसले २० महिलांच्या कपाळावरील कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:54+5:302021-06-23T04:19:54+5:30
जागतिक विधवा महिला दिवस विजय मानकर सालेकसा : मागील दीड वर्षात सालेकसा तालुक्यात एकूण २७ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. ...
जागतिक विधवा महिला दिवस
विजय मानकर
सालेकसा : मागील दीड वर्षात सालेकसा तालुक्यात एकूण २७ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी तब्बल २० महिलांना आपल्या आयुष्याचा सोबती गमवावा लागला असून, त्यांना उर्वरित आयुष्य विधवा म्हणून जगावे लागणार आहे. एकूण सात महिलांच्या मृत्यूपैकी काही महिला आपल्या चिमुकल्यासह पतीला सोडून गेल्याने त्यांचेही जीवन जगणे कठीण झाले आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये तालुक्यात तीन लोकांचा बळी गेला. तर इतर २४ लोकांचा कोरोनामुळे एप्रिल आणि मे महिन्यात मृत्यूृ झाला. २०२० मध्ये जे मृत्यूृ झाले. त्यामध्ये लटोरी येथील ग्रामपंचायतने ४८ वर्षांच्या उपसरपंचाचा मृत्यूृ झाला. तर सोनपुरी येथील ४५ वर्षांचे माजी सरपंच यांचासुद्धा कोरोनामुळे बळी गेला. एक रुग्ण २५ वर्षांचा असून, तो इंजिनियर होता. त्याने आमगाव येथे राहत असताना मृत्यूृ झाला. इसनाटोला येथील एका ३६ वर्षांच्या महिलेला कोरोनाने मृत्यूृच्या दारात ढकलले. त्या महिलेला लहान मुले व पती असून, त्यांच्यावर संकटच ओढवले. २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि एप्रिल व मे महिन्यात संपूर्ण देशात दहशत माजली. या दरम्यान तालुक्यातील २० महिलांना विधवा होण्याचे दर्दैव ओढवले. विशेष म्हणजे २० पैकी १६ पुरुष ४० ते ५५ या वयोगट दरम्यानचे आहे. अगदी कमावत्या वयात त्यांच्या पत्नीला पतीच्या सांसरीक सुखाला मुकावे लागले. दरम्यान, सालेकसा येथील एका ३५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यूृ झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुले पोरकी झाली. ज्या महिला विधवा झाल्या त्यांमध्ये ७० वर्षाच्यापेक्षा जास्त दोन, ६० वर्षाच्यावर दोन असून, इतर १६ महिलांना त्यांच्या वयाच्या ३० ते ४५ वर्षात विधवा होण्याची वेळ आली. यापैकी अनेक महिलांना आपला जोडीदार गमावल्यामुळे जीवनाची वाट खडतर झालेली दिसत आहे.
.......
समाजाने आधार देण्याची गरज
मागील दीड वर्षात कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना असे संकट व संघर्षमय जीवन जगण्याची वेळ निर्माण झाली आहे; परंतु आता वेळ आली की समाजाने विधवा महिलांनासुद्धा सन्मानाने व मनमोकळे जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे, तसेच शासन स्तरावर काही असे पाऊल उचलण्याची गरज आहे की, त्यामुळे विधवा महिलासुद्धा समाजाचा घटक म्हणून इतर महिलांसारखी प्रत्येक कामात सहभागी होऊ शकेल व तिलाही काही करण्याची मुभा मिळू शकेल.
........
कोट
माझे पती घरातील एकमेव कमावते व्यक्ती असून, आर्डरवर स्वयंपाक तयार करून अर्थार्जन करीत घर चालवित होते. त्यांच्या निधनाने सर्व दरवाजे बंद झाले असून, पुढचे आयुष्य संघर्षमय वाटत आहे.
- चंद्रकला माधव थेर, सालेकसा.