गोंदिया जिल्ह्यात झेडपी, कलेक्टर, एसपी ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:54 AM2020-08-25T11:54:19+5:302020-08-25T11:54:40+5:30
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून पोलीस अधिक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून पोलीस अधिक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.
जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव,देवरी,सालेकसा व नवेगावबांध पोलीस अधिक्षक कार्यालयत कोरोनाचा शिरकाव झाला असून अधिकारी क्वारंटाईन झालेत.आत्ता जिल्हा परिषदेतही शिरकाव झालेला आहे. सदर कर्मचारी हा आपल्या विभागप्रमुखासह जिल्हा परिषदेच्या वाहनाने चार ते पाच दिवस आधी नागपूरला विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आला होता. त्याला कर्मचाऱ्याला बरे वाटत नसल्याने तपासणी केली असता सोमवारी रात्री त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपूरला गेलेल्या सर्वांची तपासणी बहुतेक केली जाणार असल्याने जिल्हा परिषदेला लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात जिल्हा परिषद सनिटाईज करण्यात आली नसल्याचीही माहिती समोर आली आहे.