कोरोनाचे संकट लवकर जावू दे म्हणत महिलांनी घातले देवीकडे साकडे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:18+5:302021-06-06T04:22:18+5:30

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी-कनेरी या गावच्या पश्चिम दिशेला गाव देवीचे माता मंदिर आहे. गावातील महिलांसाठी संसाराची सारी दु:खे व्यक्त ...

Corona's crisis, let the women go to the goddess sakade () | कोरोनाचे संकट लवकर जावू दे म्हणत महिलांनी घातले देवीकडे साकडे ()

कोरोनाचे संकट लवकर जावू दे म्हणत महिलांनी घातले देवीकडे साकडे ()

Next

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी-कनेरी या गावच्या पश्चिम दिशेला गाव देवीचे माता मंदिर आहे. गावातील महिलांसाठी संसाराची सारी दु:खे व्यक्त करण्यासाठी एकमेव स्थान म्हणजे गाव देवीचे मंदिर, गावावर येणारे कोणतेही संकट गाव देवी दूर करीत असल्याची श्रध्दा आणि दृढ विश्वास आहे. त्यामुळे देवीची पूजा अर्चना करुन कोरोना विषाणूच्या महामारीचा प्रकोप निश्चितच कमी होईल या आशेने सकाळी आंघोळ केल्यानंतर आळीपाळीने गावातील महिला वर्ग देवीकडे गाऱ्हाने मांडीत आहेत. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या प्रकोपामुळे गावातील वातावरण भयभीत झाले आहे. भयावह वातावरण कमी करण्यासाठी किंवा कोरोनाचे संकट कायमचे नष्ट करण्यासाठी महिलांना आपली दु:ख व्यक्त करण्यासाठी गावातील एकमेव असलेले श्रध्दास्थान गाव देवीचे मंदिर मातामाऊली या मंदिरात गेल्या आठ दिवसापासून गावातील महिला कसलीही गर्दी न करता देवीच्या मंदिरात जावून पूजा अर्चना करुन कोरोनाचे संकट जावू दे अशी आस धरुन प्रार्थना करुन देवीला साकडे घालीत आहेत.

Web Title: Corona's crisis, let the women go to the goddess sakade ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.