कोरोनाच्या डेल्टा प्लसने वाढविली जिल्हावासीयांची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:28+5:302021-06-25T04:21:28+5:30
गोंदिया : राज्यात सर्वच कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने सर्वच व्यवहार आता पूर्व पदावर येत आहेत. त्यातच महाराष्ट्रातील सहा ...
गोंदिया : राज्यात सर्वच कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने सर्वच व्यवहार आता पूर्व पदावर येत आहेत. त्यातच महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे २२ रुग्ण आढळल्याने पुन्हा नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लसची लक्षणेही कोरोनाच्या लक्षणांसारखीच आहेत. या आजाराच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्रात वाढ होण्यास प्रारंभ झाल्याने खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागालाही डेल्टा प्लसच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. डेल्टा प्लस या आजाराच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मात्र संभाव्य धोका लक्षात घेता आतापर्यंत दोन टप्प्यांत एकूण ५० नमुने पुणे आणि दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. डेल्टा प्लस कोविड विषाणू सर्वप्रथम मार्च २०२१ मध्ये युरोपमध्ये तिसऱ्या लाटेत आढळला होता. सध्या भारतासह आठ ते दहा देशांत हा विषाणू आढळला आहे. डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आयसीएमआर व इतर राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांनी वर्तविली आहे. त्याच अनुषंगाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे करण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
...............
जिल्ह्यात काय खबरदारी घेतली जातेय
- महाराष्ट्रात डेल्टा प्लस आजाराचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, ठाणे, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे.
- या सहा जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवाशांना जिल्ह्यात आल्यानंतर त्याची माहिती प्रशासनाला देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- डेल्टा प्लसच्या अनुषंगाने या सहा जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे नमुने पुणे आणि दिल्ली येथील प्रयोगशाळांत तपासणीसाठी पाठविले जात आहे.
- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे भर दिला जात आहे.
..........
जिल्ह्यात दररोज तीन हजारांवर चाचण्या
- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात दररोज तीन हजारांवर आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजनच्या चाचण्या केल्या जात आहेत. यात चार ते पाच रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत.
- मागील आठवड्याभरापासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्याच्या आतच आहे.
- क्रियाशील रुग्णांची संख्या ४५च्या आत आली असून, जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे.
- कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.१८ टक्के आहे.
........................
कोरोनाचे एकूण रुग्ण :
एकूण बरे झालेले रुग्ण :
कोरोनाचे एकूण बळी :
क्रियाशील रुग्ण :