कोरोनाचा ग्राफ होतोय अपडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:42+5:302021-07-02T04:20:42+5:30

गोंदिया : मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा ग्राफ अपडाऊन होत असल्याचे चित्र असून, ...

Corona's graph is being updated | कोरोनाचा ग्राफ होतोय अपडाऊन

कोरोनाचा ग्राफ होतोय अपडाऊन

Next

गोंदिया : मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा ग्राफ अपडाऊन होत असल्याचे चित्र असून, जिल्हावासीयांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जिल्ह्यात पुन्हा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी जिल्ह्यात २,३१३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ८१० नमुन्यांची आरटीपीसीआर, तर १,५०२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात आठ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३४ टक्के आहे. गुरुवारी (दि.१) जिल्ह्यातील २ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर आठ नवीन रुग्णांची भर पडली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,९६,३१९ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,७०,९४७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत २१८०३१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,९७,०७१ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४,११३८ कोरोनाबाधित आढळले. यापैकी १,९७,०७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असूृन, २९८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

........

डेल्टा, डेल्टा प्लसच्या अनुषंगाने दक्षता

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. त्यातच कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लसचा शिरकाव होऊ नये या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नियमित तपासणी केले जाणाऱ्या नमुन्यांपैकी काही नमुने पुणे व दिल्ली येथील प्रयोगशाळेत सुद्धा तपासणीसाठी पाठविली जात आहे.

..................

Web Title: Corona's graph is being updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.