सात दिवसात खालावला कोरोनाचा आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 05:00 AM2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:21+5:30
बुधवारी (दि.७) ५६ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ८१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. गोंदिया येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मागील सात महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीने गोंदियावासीय त्रस्त झाले होते. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७६६३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ६५२१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोदिया : जिल्ह्यात मागील दोन महिन्यात कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने जिल्ह्यावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्ण वाढीचा चढता आलेख पाहता ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाचा आलेख सातत्याने खालावत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
बुधवारी (दि.७) ५६ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ८१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. गोंदिया येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मागील सात महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीने गोंदियावासीय त्रस्त झाले होते. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७६६३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ६५२१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात १०३६ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात बुधवारी आढळलेल्या एकूण ५६ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ४१ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २, गोरेगाव २, आमगाव ३, सालेकसा २, देवरी २, सडक अर्जुनी तालुक्यातील चार कोरोना बाधितांचा समावेश आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गोंदिया येथील प्रयोगशाळेत ३१ हजार ८९० स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यामध्ये २४ हजार ८५२ नमुने निगेटिव्ह आले आहे. तर ७६६३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. २०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलबिंत आहे. तर अनिश्चित नमुन्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
जनजागृती मोहीमेचा फायदा
जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी माझे कुटुंब-माझी जवाबदारी माझी जनजागृती ही हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत प्रशासन एकाच दिवशी १० लाख ५० हजार कुटुंबापर्यंत पोहचले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होत आहे.
आकडे कमी झाल्याने आश्चर्य
जिल्ह्यात मागील सात दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. रुग्ण तीन आकडी रुग्ण संख्या ही दोन आकडी झाली आहे. तर कोरोना बाधितांची टेस्ट न करताच त्यांना कोरोनामुक्त घोषीत केले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.