कोरोनाचा पाॅझिटिव्हिटी रेट अर्ध्या टक्क्यापेक्षा कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:22+5:302021-07-19T04:19:22+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी (दि. १८) ११०६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १०१४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ९२ ...
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी (दि. १८) ११०६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १०१४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ९२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात दोन नमुने कोरोना पाॅझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२ टक्के आहे.
मागील दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळेच कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने डाऊन होत असून त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ वर आली आहे. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४० टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळेसुद्धा कोरोना बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणण्यास मदत असून जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. रविवारी जिल्ह्यात पाच बाधितांनी कोरोनावर मात केली तर दोन नवीन रुग्णांची भर पडली. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २,११,२२७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १,८५,९६८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. काेरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत २,२०,८०९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,९९,७२५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१७२ कोरोनाबाधित आढळले असून ४०,४५९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्य:स्थितीत १२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १६५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..................
लसीकरणाची साडेपाच लाखांच्या दिशेने वाटचाल
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळेच लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५,३२,३८३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.
................
दोन तालुके झाले कोरोनामुक्त
कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून सद्य:स्थितीत केवळ १२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर गाेरेगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून हे दोन्ही तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.
..........