कोरोनाचा रिकव्हरी दर ९९.२७ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:10+5:302021-08-15T04:30:10+5:30
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी (दि. १४) ६०३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ५१४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ८९ नमुन्या रॅपिड ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी (दि. १४) ६०३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ५१४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ८९ नमुन्या रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना ॲक्टिव्ह आढळला नाही. जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून गोंदिया, तिरोडा, आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी हे सात तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. केवळ सालेकसा तालुक्यात १ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्या आठवडाभरात पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ४,४१,७८५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २,२३,३०९ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,१८,४७६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१,१९५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले असून यापैकी ४०,४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. तर एकाही बाधिताने मात केली नव्हती. त्यामुळे बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती.
...............
६ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील एकूण १२ लाख ६५ हजार नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. यापैकी आतापर्यंत ६ लाख ६२ हजार ३९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची टक्केवारी ५१ टक्केच्यावर पोहोचली आहे.