कोसमतोंडी वनपरिक्षेत्रात रोजच लागतोय वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 08:57 PM2018-04-05T20:57:30+5:302018-04-05T20:57:30+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होत आहे. वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.

Cosmotondi forest reserve is daily used | कोसमतोंडी वनपरिक्षेत्रात रोजच लागतोय वणवा

कोसमतोंडी वनपरिक्षेत्रात रोजच लागतोय वणवा

Next
ठळक मुद्देदुर्लक्ष : वनविभागामार्फत कारवाई शून्य

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होत आहे. वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील मुरपार, लेंडेझरी, धानोरी, मालीजुंगा, मुरपार राम, डुंडा, सितेपार इत्यादी ठिकाणी नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. याची देखरेख करण्यासाठी वनविभागामार्फत वनरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या परिसरातील वनरक्षक व वनमजूर मुख्यालयी न राहता दुसºया ठिकाणी राहून मुख्यालयी राहण्याचा दाखला देवून पगाराची उचल करतात. याची वनविभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी पाहणी केली. मात्र त्यानंतर यावर कुठलीच कारवाही केली नाही. त्यामुळे दररोज मोहफुले वेचणाºया व तेंदूपत्ता संकलन करणाºया कंत्राटदाराच्या माध्यमातून जंगलात आग लावली जात आहे. यात लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होत आहे. या आगीचा फटका जंगलातील वन्यप्राण्यांना सुध्दा बसत आहे. वनविभागाचे कठोर नियम असून सुद्धा वनसंपदा जाळणाºया इसमांवर किंवा कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही? हा शोधाचा विषय बनलेला आहे. यात वनविभागातील काही कर्मचारी व कंत्राटदार यांची साठगाठ असल्यामुळेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.
कोसमतोंडी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी भर्ती करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस जंगलात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून वेळीच उपाय योजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची कार्यालयातून बदली करण्याची मागणीसुद्धा अनेकदा करण्यात आली. वनात आग लावणाºयांवर वनविभागामार्फत कारवाई सुद्धा झाल्याचे दिसून येत नाही.

Web Title: Cosmotondi forest reserve is daily used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.