एसआरटी लागवड पद्धत कमी खर्चाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:45 PM2017-11-07T23:45:08+5:302017-11-07T23:45:31+5:30

वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. पर्यायाने विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो.

The cost of the SRT cultivation method is low | एसआरटी लागवड पद्धत कमी खर्चाची

एसआरटी लागवड पद्धत कमी खर्चाची

Next
ठळक मुद्दे१४ जिल्ह्यांत लागवड : २ हजार ५०० शेतकºयांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. पर्यायाने विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो. शेतकºयांवर अशी वेळ येवू नये याकरिता शेतकºयांनी अतिशय कमी खर्चाची आणि २० वर्षात एकदाच मशागत करुन लागवड केलेली एसआरटी पद्धत उपयोगात आणली तर शेतकºयांचा मशागतीवरचा खर्च, लागवड खर्च, रासायनिक खताचा खर्च, औषधीचा खर्च, वेळ, श्रम, पैसा आणि पाण्याची बचत होईल अशी माहिती कृषीभूषण चंद्रशेखर गडसावळे यांनी दिली.
सडक-अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पत्रकारांसोबत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी आपल्या शेतीवर प्रत्यक्ष प्रयोग करुन झिरो बजेट असणारी शेती करुन नंतर त्याचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्टÑात १४ जिल्ह्यात २ हजार ५०० शेतकरी झिरो बजेट शेती करीत आहेत. वाल, चना, लाखोरी, चवळी, धान, मका, ज्वारी, सोयाबिन, कोबी, कापूस अशासारखी पिके घेतली जातात. जर लागवड खर्चच कमी असेल तर शेतकरी कर्जबाजारी होवू शकत नाही असेही गटसावळे यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगीतले. एसआरटी पद्धत नेमकी काय आहे यावर बोलताना ते म्हणाले जमिनीवर होणारे नागरिकांचे अत्याचार न होता जमिनीची धूप थांबविणे, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देणे, त्यामुळे जमिनीत सेंद्रीय कर्ज साठविले त्यामुळे उत्पादनात निश्चित वाढ होवून शेतकºयांना आनंदी करणारी पीक रचना म्हणजे एसआरटी होय. हे तंत्रज्ञान गोंदिया जिल्ह्यातील शेतकºयांनी उपयोगात आणल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशिवार, संचालक देवचंद तरोणे, दिलीप गभणे, हिरालाल चव्हाण, वसंत गहाणे, डॉ. ऋषीराम वाढई. गंगाधर सोनवने, रतिराम कांबळे, रोशन बडोले, सुखदेव कोरे, मिलन राऊत उपस्थित होते.

Web Title: The cost of the SRT cultivation method is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.