मानसिक आजारग्रस्त रुग्णांना सल्ला व औषधोपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:26 AM2021-03-07T04:26:27+5:302021-03-07T04:26:27+5:30

मानसिक आजारग्रस्त रुग्णांना सल्ला व औषधोपचार ते दर महिन्याला देणार आहेत. मानस उपचार तज्ञांची चमू दर महिन्याला सेवा ...

Counseling and medication for mentally ill patients | मानसिक आजारग्रस्त रुग्णांना सल्ला व औषधोपचार

मानसिक आजारग्रस्त रुग्णांना सल्ला व औषधोपचार

Next

मानसिक आजारग्रस्त रुग्णांना सल्ला व औषधोपचार ते दर महिन्याला देणार आहेत. मानस उपचार तज्ञांची चमू दर महिन्याला सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील या एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. तालुक्यातील नवेगावबांध व अर्जुनी मोरगाव ग्रामीण रूग्णालयातही या सुविधेचा लाभ रुग्णांना घेता येईल. मानसिक आजारग्रस्त रुग्णांनी चिकित्सा व उपचार याचा लाभ घ्यावा. मानसिक विकार असलेल्या परिसरातील रुग्णांना गोंदिया येथे जावे लागणार नाही. कोरोना लसीकरणासाठी ६९ व ४५ ते ५९ वर्षे वय असलेल्या लोकांनी आपले नाव ग्रामपंचायत येथे नोंदवावे. कोरोना चाचणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन वेळोवेळी आपले नाव नोंदवावे असे डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितले. गावोगावी जाऊन कोरोनाची चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत केली जात असल्याची माहिती डॉ. श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांनी दिली आहे.

Web Title: Counseling and medication for mentally ill patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.