काऊंन्सलिंग सेमिनार २९ रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:34 PM2018-03-26T22:34:07+5:302018-03-26T22:34:07+5:30

लोकमत बाल विकास मंचच्यावतीने २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पासून येथील अग्रसेन भवन सिटी पोलीस स्टेशनच्या मागे गोंदिया येथे फ्री कॅरिअर काऊंसलिंग ‘दहावीनंतर काय?’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Counseling Seminar on 29th | काऊंन्सलिंग सेमिनार २९ रोजी

काऊंन्सलिंग सेमिनार २९ रोजी

Next
ठळक मुद्देदहावी नंतर काय? : विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : लोकमत बाल विकास मंचच्यावतीने २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पासून येथील अग्रसेन भवन सिटी पोलीस स्टेशनच्या मागे गोंदिया येथे फ्री कॅरिअर काऊंसलिंग ‘दहावीनंतर काय?’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात वर्ग ९ ते १२ वी चे विद्यार्थी व पालक नि:शुल्क सहभागी होऊ शकतील. प्रथम ३०० विद्यार्थी, पालक व सखी मंच सदस्यांना सहभागी होता येणार आहे. नुकतीच दहावीची परीक्षा देवून विद्यार्थी पुढे काय शिकावे याच्या विवंचनेत पडले आहेत.
दहावीनंतर शिक्षणात विविध क्षेत्र त्यांना आकर्षित करीत आहेत. परंतु त्यांच्या भविष्याला कलाटणी देणारे हे वर्ष खूप महत्वाचे आहे. विद्यार्थीच नव्हे तर पालकही गोंधळून गेले आहेत. त्यातही डॉक्टर व्हायच की इंजिनिअर व्हायंच निकालानंतर पुढे काय करायचे? कुठले कॉलेज निवडायचे? कुठली फॅक्लटी घायची? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडतात. डॉक्टर व्हायच, इंजिनियर व्हायच, पायलट व्हायच, सायंस स्ट्रीम निवडायची, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या आयडीयल चर्चासत्र म्हणजेच फ्री कॅरिअर काऊंसलिंग कार्यशाळेत मिळतील. कोणते शिकवणी वर्ग, कोणते कॉलेज आणि मोठा यज्ञ प्रश्न म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांचे करिअर विषयीचे दुमत अथवा मतभेद या सर्व प्रश्नांची उत्तरे हवे असतील तर या करिअर काऊन्सलींग प्रोग्रामध्ये योग्य मार्गदर्शन देण्यात येईल. या कार्यक्रमाला चाणक्य काऊंन्सीलींग चे मुख्य मार्गदर्शक जगदीश अग्रवाल मार्गदर्शन करणार आहेत. लवकरात लवकर विद्यार्थ्यांसह-पालकांनी कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी व जागा निश्चित करण्यासाठी जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी संपर्क करावे. मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. सखी मंच सदस्यही कार्यक्रमात उपस्थित राहू शकतात.

Web Title: Counseling Seminar on 29th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.