धान खरेदी केंद्रावर जुन्याच काट्यांनी मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:54 PM2017-11-07T23:54:55+5:302017-11-07T23:55:10+5:30
तालुक्यात हलक्या धानाचा हंगाम सुरु आहे असून बाजारात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची आवक वाढलेली दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : तालुक्यात हलक्या धानाचा हंगाम सुरु आहे असून बाजारात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची आवक वाढलेली दिसत आहे. शेतकºयांना शासकीय हमी भाव मिळावा यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी शासकीय हमीभाव धान खरेंद्री केंद्र सुरु करण्यात आले. मात्र या केंद्रांवर शासकीय आदेशाची अवहेलना करुन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांना बगल देत बिनबोभाटपणे जुन्याच काट्यांनी मोजमाप होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही केंद्रांचे जबाबदार पदाधिकाºयांच्या हस्ते जुन्याच काट्यांचे पूजन करुन शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्रांचे शुभारंभ करण्यात आले.
आजघडीला अर्जुनी-मोरगाव तालुक्यात महाराष्टÑ राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (नाशिक) अंतर्गत आदिवासी विकास महामंडळ नवेगावबांधच्यावतीने आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बाराभाटी, धाबेपवनी, पांढरवाणी, गोठणगाव, केशोरी, ईळदा या ६ ठिकाणांवरुन शासकीय हमी भावाने धान खरेदी केली जात आहे. बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्टÑ स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (मुंबई) अंतर्गत जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांच्यावतीने तालुका खरेदी विक्री सहकारी समिती, दि. लक्ष्मी सहकारी भात गिरणी, विविध कार्यकारी सेवा सहकारी समिती अर्जुनी-मोरगाव, कृषक शेती उद्योग साधन सामुग्री पुरवठा व खरेदी-विक्री सहकारी संस्था भिखखिडकी तसेच बोंडगावदेवी, नवेगावबांध,महागाव, अर्जुनी-मोर, वडेगाव, धाबेटेकडी, बाक्टी या केंद्रांवर खरेदी विक्री समितीच्यावतीने शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत.
धान खरेदीच्या वेळी मोजमाप प्रक्रियेत शेतकºयांची लुट होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरात आणावे असे कार्यकारी संचालक महाराष्टÑ राज्य कृषी पणन महामंडळाचे सक्तीचे आदेश आहेत. परंतु तालुक्यात त्या आदेशाला केराची टोपली दाखवून जुन्याच काट्यांनी शेतकºयांच्या धानाची मोजणी होत असल्याचे सर्रास दिसून येत आहे. मात्र आजवर संबंधित यंत्रणा कार्यवाही करण्यात पुढे आलेली दिसत नाही. धानाची मोजणी होत असताना सर्रास लुटीचे प्रकार सुरु असून कोणीही पदाधिकारी शेतकºयांच्या मदतीला धावून येताना दिसत नाही. शेतकºयांना उलट दमदाटी होत असल्याचे प्रकार घडून येतात असे ऐकिवात आहे.
खरेदी विक्री समितीच्यावतीने बाजार समितीच्या आवारातील गोदामात दोन काटे सुरु असून शासकीय हमी भावाने धान खरेदी केला जातो. सोमवारी फेरफटका मारला असता केंद्रावर जुन्याच तराजू काट्यांनी धानाची मोजणी होत असल्याचे दिसले. बारदान्याच्या वजनासाठी एक किलो वजन होत असल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापरच केला जात नाही अशी खंत खामखुरा येथील शेतकरी राजेंद्र ठाकरे यांनी व्यक्त करुन सदर मोजणीत शेतकºयांची लूट होत असल्याने इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर व्हावा अशी मागणी केली.
अन्यथा कारवाई करु
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील बरेच शेतमाल खरेदीदार व्यापारी व शासकीय हमी भाव धान खरेदी करणाºया सहकारी संस्था आपल्या खरेदीच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचा वापर न करता जुन्याच तराजू वजन काट्यांचा वापर करीत आहेत. असे बाजार समितीच्या निदर्शनास आले आहे. शेतकºयांचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून शेतमालाचे वजन इलेक्ट्रीक वजन काट्यांवरच करण्याची दक्षता घ्यावी. वजनमापाबाबत शेतकºयांनी तक्रार केल्यास सर्वस्वी जवाबदारी खरेदीदाराची राहील. आधारभूत भावातील धान खरेदी करावे अन्यथा महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ व नियम १९६७ व उपविधीमधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील. असे पत्र बाजार समितीचे प्रभारी सचिव अशोक काळबांधे यांनी संबंधितांनी पाठविले आहे.