जातीवादाच्या रोगामुळे देश आजारी पडला
By admin | Published: October 19, 2016 02:51 AM2016-10-19T02:51:15+5:302016-10-19T02:51:15+5:30
भारत देशात अनेक रोग आहेत. ते तेवढे घातक नाही, परंतु जातीवादाचा रोग भयंकर घातक असून जातीवादाच्या रोगामुळे देश आजारी पडला आहे.
कवाडेंचे मत : कार्यकर्ता मेळाव्यात
सडक-अर्जुनी : भारत देशात अनेक रोग आहेत. ते तेवढे घातक नाही, परंतु जातीवादाचा रोग भयंकर घातक असून जातीवादाच्या रोगामुळे देश आजारी पडला आहे. त्यामुळेच देशाचा विकास थांबला आहे, असे मत पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी सडक-अर्जुनी येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
पिरिपाच्यावतीने येथील दुर्गा चौकात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊदास जांभुळकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.जोगेंद्र कवाडे आणि जयदेव कवाडे उपस्थित होते. यावेळी पिरीपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पुरण लोणारे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष राजू भेलावे, युसूफ पटेल,नागपूर प्रदेश अध्यक्ष सुरेश सतदेवे, भंडारा अध्यक्ष मदन गोस्वामी, भंडारा महासचिव अनमोल गजभिये, विजय रामटेके, सुशिला भालाधरे, शामसुंदर बन्सोड, महेंद्र नागदेवे, सुशिल लाडे, श्रध्दा रामटेके, सुकदास साखरे, चक्रपाणी शहारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्यात जयदीप कवाडे यांनी तुफान भाषणबाजी करून दलित बांधवांची मते जिंकली. त्याचप्रमाणे अनेक पाहुण्यांनी धम्मचक्र परिवर्तन आणि कार्यकर्ता मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजक भाऊदास जांभूळकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन शामसुंदर बन्सोड यांनी तर आभार सुरेश भालाधरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)