देश महाशक्ती होण्यासाठी एकसंघ असण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:03+5:30

इंदिरा गांधी स्टेडियम येथे रविवारी (दि.१३) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ‘नगर एकत्रीकरण’ कार्यक्र मात ते बोलत होते. या वेळी मंचावर फेडरेशन ऑफ विदर्भ राईस इंड्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, जिल्हा संघचालक लिलाराम बोपचे, नगर संघचालक मिलिंद अलोनी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी शहरातील प्रमुख मार्गाने स्वयंसेवकांचे पथसंचलन करण्यात आले. योग प्रात्यिक्षक स्वयंसेवकांनी सादर केले. श्रीधर गाडगे म्हणाले, आजचा हा कार्यक्रम म्हणजे त्रिवेणी संगमाचा योग आहे.

The country needs to be united to become a superpower | देश महाशक्ती होण्यासाठी एकसंघ असण्याची गरज

देश महाशक्ती होण्यासाठी एकसंघ असण्याची गरज

Next
ठळक मुद्देश्रीधर गाडगे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर एकत्रीकरण कार्यक्रम, पथसंचलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्राचीन काळापासून भारत हा हिंदू राष्ट्र म्हणून जगात ओळखला जातो. मात्र, भारतात राहूनही देशाची ही ओळख काही जणांना नको आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर आजवर हे विरोधक राष्ट्रधर्माविरोधात आगपाखड करीत आलेले आहेत. हे अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे. कोणताही देश हा एकसंघ असल्याशिवाय महाशक्ती होऊ शकत नाही.म्हणून संघ म्हणतो, तुम्ही कुणाचीही पुजा करा, परंतु देशाला आपले मानून राष्ट्रधर्म पाळा. मात्र ते काही जणांना मान्य नसल्याने तुकडे तुकडे गँग देशाचेच नुकसान करीत आहे. त्यामुळे देशात राहणाऱ्या प्रत्येकाचा राष्ट्रधर्म एकच ही भावना रुजविण्याचे कार्य संघ करीत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघ नागपूर महानगरचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी केले.
येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे रविवारी (दि.१३) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ‘नगर एकत्रीकरण’ कार्यक्र मात ते बोलत होते. या वेळी मंचावर फेडरेशन ऑफ विदर्भ राईस इंड्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, जिल्हा संघचालक लिलाराम बोपचे, नगर संघचालक मिलिंद अलोनी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी शहरातील प्रमुख मार्गाने स्वयंसेवकांचे पथसंचलन करण्यात आले. योग प्रात्यिक्षक स्वयंसेवकांनी सादर केले. श्रीधर गाडगे म्हणाले, आजचा हा कार्यक्रम म्हणजे त्रिवेणी संगमाचा योग आहे.
मकरसंक्रांतींच्या पूर्वसंध्येवर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा हा योग आहे. मध्यवर्ती विचार केंद्र म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे आज संपूर्ण जग विश्लेषण करीत आहे. मात्र संघाच्या या विचारधारेचा अनेकांना त्रास होतो. कारण आम्ही हिंदूराष्ट्र म्हणतो. या देशातील काहींनी भारताला आपला देश मानला असता तर देशाचे तुकडे झाले नसते.
देशात सध्या काही गोष्टींवर चिंतन होणे गरजेचे आहे. याकूब मेमनच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होणारे हजारो लोक, काही विद्यापीठात ‘भारत तेरे टुकडे होंगे, ‘पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणारे, महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणारे हे लोक केंद्र सरकारने काढून घेतलेल्या कलम ३७०, श्रीरामजन्मभूमी प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात, तीन तलाक कायदाबाबत ते काहीही बोलू किंवा करु शकले नाही.परंतु, नागरिकता संशोधन कायदा होताच काही राजकीय पक्ष याविरोधात उभे झाले. याचा लाभ घेत ते कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले.
नागरिकता संशोधन कायदा हा देशात राहणाऱ्या नागरिकांच्या विरोधाातील कायदा नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. मात्र, या कायद्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. कारण त्याच्यात एक शब्द सुटून गेले आहे. तो सरकारने जाणीवपूर्ण सोडला आहे. कारण १९४७ मध्ये देशाचे विभाजन झाल्यावर घुसखोरी करणाऱ्यांची संख्या देशात ३ कोटी आहे.
घुसखोरांमुळे देशाच्या नागरिकांचे अधिकार व हक्क हिरावल्या जात आहे. त्यामुळे अशा घुसखोरांना शोधणे आवश्यक आहे. ज्यांना आपल्या देशात यायचे आहे, त्यांनी समोरच्या मार्गाने यावे. कागदानिशी नागरिकता घ्यावी.
१९४७ ते २०१४ पर्यंत जे शरणार्थी येथे वास्तव्यास आहेत, त्यांना नागरिकता देणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र काही जणांकडून गोबल तत्वानुसार, एखादी खोटी गोष्ट वारंवार पटवून सांगितल्यास ती खरी वाटते, अशी स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. १९४७ मध्ये संघ विभाजन रोखू शकले नव्हते. मात्र, लोकांची सुरक्षा संघाने केली होती. त्यामुळे भारताच्या निर्माणासाठी समस्यांचे निराकारण करणारा समाज घडविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनातील एक तास देशासाठी द्यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या वेळी अशोक अग्रवाल म्हणाले, मी बालपणापासूनच संघाची अनुुशासन, राष्ट्रभक्ती व निस्वार्थ सेवाभाव बघत आलो आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये जे निर्णय श्रीराम जन्मभूमीबाबत सुप्रिम कोर्टाने घेतले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. तसेच कलम ३७० हटविण्यासाठी व नागरिकता संशोधन कायदा केल्याबद्दल देशातील संसदेचे आभार मानतो.
सरकारने समान नागरिकता कायदा आणावा, यामुळे असंतुलन दूर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन करून आभार नगर कार्यवाह बाळकृष्ण बिसेन यांनी मानले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ स्वयंसेवक, मातृशक्ती व नागरिक उपस्थित होते.

Web Title: The country needs to be united to become a superpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.