केटीएसच्या दोन कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:29 AM2021-05-10T04:29:23+5:302021-05-10T04:29:23+5:30
के.टी.एस. दवाखान्यातील सफाई कामगार सागर पटले रा. मोठा रजेगाव हा विनापरवाना रेमडेसिविर इंजेक्शन १८ हजार रुपये दराने विकत असल्याची ...
के.टी.एस. दवाखान्यातील सफाई कामगार सागर पटले रा. मोठा रजेगाव हा विनापरवाना रेमडेसिविर इंजेक्शन १८ हजार रुपये दराने विकत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घालून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले. सागर पटले याच्याकडे ते इंजेक्शन कुठून आले यासंदर्भात विचारणा केली असता केटीएस रुग्णालय गोंदिया येथे अधिपरिचारक (स्टाफ ब्रदर) अशोक उत्तमराव चव्हाण रा. शास्त्रीवाॅर्ड गोंदिया याच्याकडून आणल्याचे सांगितले. या दोघांविरुध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, १८८, ३४ सह परिशिष्ट २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्या दोघांना न्यायालयाने ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्या आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून भंडारा तुरुंगात रवानगी केली आहे. तपास ठाणेदार महेश बनसोडे, पोलीस हवालदार घनश्याम थेर यांनी केला आहे.