न्यायालयाने रेल्वे कर्मचाऱ्यांना सुनावली वनकोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 05:00 AM2021-03-11T05:00:00+5:302021-03-11T05:00:21+5:30

वाघाच्या बछड्याचा एक पाय गायब होता. गहाळ झालेल्या पायाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने श्वान पथकाची मदत घेतली व सर्व संशयितांवर नजर ठेवली होती. त्यानंतर घटना घडल्या त्यादिवशीच वनविभाग गोंदिया व गोरेगाव वनपरिक्षेत्राच्या चमूने धडक कारवाई करून रेल्वे कर्मचारी चाबीदार पुरुषोत्तम तुलाराम काळसर्पे यांना त्यांच्या घरी दांडेगाव (एकोडी) व हरिप्रसाद मीना (रा.गोंगले) यांना रात्री १२ वाजता ताब्यात घेऊन विचारपूस केली होती.  गायब असलेला तो वाघाचा पाय त्यांच्या जवळून हस्तगत करण्यात वनविभागास यश आले आहे.

The court sentenced the railway employees to jail | न्यायालयाने रेल्वे कर्मचाऱ्यांना सुनावली वनकोठडी

न्यायालयाने रेल्वे कर्मचाऱ्यांना सुनावली वनकोठडी

Next
ठळक मुद्देअपघातात तुटलेला पाय केला होता चोरी

 गोंदिया : वाघिणीसह तिचे ३ बछडे रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत एक बछडा ठार झाला होता.  अपघातात मरण पावलेल्या बछड्याचा एक पाय रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी या दोघांना ताब्यात घेऊन चतुर्थश्रेणी न्यायालयात बुधवारी (दि.१०) हजर केले असता त्यांना  शुक्रवारपर्यंत (दि.१२) वनकोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी (दि.८) सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास सौंदडकडून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहक रेल्वेने रेल्वे खांब क्र. १०२५-८ व ९ दरम्यान वाघास धडक दिल्याची माहिती पिंडकेपार सहवन क्षेत्राचे सहायक डी.एल. धुर्वे यांना रेल्वे फाटकच्या स्वीच मॅनने दिली. या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाघाच्या बछड्याचा एक पाय गायब होता. गहाळ झालेल्या पायाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने श्वान पथकाची मदत घेतली व सर्व संशयितांवर नजर ठेवली होती. त्यानंतर घटना घडल्या त्यादिवशीच वनविभाग गोंदिया व गोरेगाव वनपरिक्षेत्राच्या चमूने धडक कारवाई करून रेल्वे कर्मचारी चाबीदार पुरुषोत्तम तुलाराम काळसर्पे यांना त्यांच्या घरी दांडेगाव (एकोडी) व हरिप्रसाद मीना (रा.गोंगले) यांना रात्री १२ वाजता ताब्यात घेऊन विचारपूस केली होती.  गायब असलेला तो वाघाचा पाय त्यांच्या जवळून हस्तगत करण्यात वनविभागास यश आले आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना १२ मार्च पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

Web Title: The court sentenced the railway employees to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.