जिल्ह्यात सिरमच्या कोव्हिशिल्डलाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:24+5:302021-06-22T04:20:24+5:30

गोंदिया : लस निर्मितीच्या क्षेत्रात अवघ्या जगात अग्रगण्य असलेल्या सिरम इंस्टिट्यूटला आज बहुतांश व्यक्ती ओळखू लागले आहेत. कोरोनावर सर्वात ...

The cove shield of serum is preferred in the district | जिल्ह्यात सिरमच्या कोव्हिशिल्डलाच पसंती

जिल्ह्यात सिरमच्या कोव्हिशिल्डलाच पसंती

Next

गोंदिया : लस निर्मितीच्या क्षेत्रात अवघ्या जगात अग्रगण्य असलेल्या सिरम इंस्टिट्यूटला आज बहुतांश व्यक्ती ओळखू लागले आहेत. कोरोनावर सर्वात अगोदर लस तयारी कंपनी म्हणून सिरम इंस्टिट्यूटनेच कामगिरी केली आहे. सिरमच्या कोव्हिशिल्डबाबत अधिकच आकर्षण दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणात कोव्हिशिल्ड लसीलाच नागरिकांकडून जास्त पसंती दिली जात आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३५०६५२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र यामध्ये २२९९३० नागरिकांनी सिमरची कोव्हिशिल्ड हीच लस पसंत केली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे, तर कोव्हॅक्सिनचा १२०७२२ नागरिकांनी डोस घेतला आहे. यावरून कोव्हिशिल्ड़लाच जिल्ह्यात जास्त पसंती दिली जात असल्याचे दिसत असतानाच, दुसरी बाब म्हणजे कोव्हिशिल्डचा पुरवठा अधिक प्रमाणात होत असल्याने आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तर नागरिकांचा कलसुध्दा कोव्हिशिल्ड घेण्याकडे अधिक आहे.

---------------------------------

एकूण लसीकरण- ३५०६५२

कोव्हिशिल्ड- २२९९३०

कोव्हॅक्सिन- १२०७२२

वयोगटानुसार लसीकरण (ग्राफ)

कोव्हिशिल्ड कोव्हॅक्सिन

पहिला डोस दुसरा डोस पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी ९८२४ ५८९२ ४४९ २०२

फ्रंटलाईन १९३९२ १०४१९ ४७९७ १९६३

१८ ते ४४ ४४२७ १२४ ८१७२ ५३२६

४५ ते ५९ ९३४०६ १८०८८ ४५००१ १४८७९

६० वर्षांवरील ५२५९३ १५७६५ २९८८५ १००४८

--------------------------------

कोव्हिशिल्डच का?

भारतात असलेली सिरम इंस्टिट्यूट ही कंपनी लस निर्मिती क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. शिवाय सिरमनेच कोरोनावरील लस सर्वात अगोदर तयार केली असून, यामुळे सुरुवातीपासूनच सिरमचे नाव चर्चेत आले आहे. भारतात तयार झालेली सिरमची लस अन्य देशांनाही मागणी केल्याने त्याबाबत नागरिकांत अधिकच विश्वास निर्माण झाल्याचे दिसते. यातूनच कोव्हिशिल्डला जास्त पसंती असल्याचे नागरिक बोलून दाखवितात.

----------------------------

कोरोनावर देशात दिल्या जात असलेल्या कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस सुरक्षित व तेवढ्याच परिणामकारक आहेत. जिल्ह्यात कोव्हिशिल्डचा पुरवठा कोव्हॅक्सिनच्या तुलनेत सुरुवातीपासूनच जास्त प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यात तिचेच वितरण करण्यात आले. यामुळेही कोव्हिशिल्ड लस जास्त नागरिकांना देण्यात आली. दोन्ही लस सुरक्षित असल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे.

- डॉ. नितीन कापसे,

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: The cove shield of serum is preferred in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.