विविध मागण्यांसाठी गोरेगावात भाकपचा मोर्चा
By admin | Published: February 7, 2017 01:01 AM2017-02-07T01:01:35+5:302017-02-07T01:01:35+5:30
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने शहीद दिवस व धर्मनिरपेक्षता संरक्षण दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
गोरेगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने शहीद दिवस व धर्मनिरपेक्षता संरक्षण दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
शेतमजूर, वनहक्कधारक व घरकूलधारकांना जमिनीचे मालकीय पट्टे द्यावे, १५-१६ मध्ये आवास योजनेचे थकीत हप्ते द्यावे, रोजगार हमीच्या कामावर ४०० रूपये मजूरी, वृद्धपेंशन मदत एक हजार रूपये करावी, वनहक्क जमिनीचे पट्टे द्यावे, रूग्णालयात एक्स-रे मशिन लावून डॉक्टरांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान नायब तहसीलदार वेदप्रकाश बेदी, खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, वनक्षेत्र अधिकारी एस.एन.जाधव व पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, जिल्हा सचिव मिलींद गणवीर, चरणदास भावे, प्रल्हाद उके, परेश दुरूगवार, भैय्यालाल कटरे, दुलीचंद कावडे, गुणवंत नाईक, नारायण भलावी, भोलाराम मरसकोल्हे, रायाबाई मारगाये, लिलाबाई वाघाडे, राधाबाई शेंडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)