परवानाधारक ऑटोरिक्षा धारकांसाठी आधार सहाय्यता केंद्र तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:30+5:302021-05-29T04:22:30+5:30
लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे नुकसान होणाऱ्या परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना मदत म्हणून राज्य शासनाने सानुग्रह अनुदान घोषित केले ...
लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे नुकसान होणाऱ्या परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना मदत
म्हणून राज्य शासनाने सानुग्रह अनुदान घोषित केले आहे. ही रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात थेट जमा केली
जाणार असून, त्याकरिता ऑटो परवानाधारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील वैध परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना त्यांचे आधारकार्ड अद्ययावत करून घेण्याकरिता
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील खोली क्रमांक-२ मध्ये आधार सहाय्यता केंद्र तयार करण्यात आले आहे. या
केंद्रामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून २ आधार चालकांची नियुक्ती करण्यात आली असून, केंद्र २८ मे ते ५
जून या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
गुरूवारी (दि. २७) झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार परवानाधारक ऑटोरिक्षा
चालकांना १५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यासंबंधाने कार्यालयात कामकाज सुरू करण्यात आलेले आहे. तरी
लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपले आधारकार्ड नूतनीकरण - अद्ययावतीकरण करून घ्यावे व त्यानंतर
संकेतस्थळावर १५०० रुपये सानुग्रह अनुदान संबंधाने ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.