विकास आराखडा तयार करा, निधी उपलब्ध करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:21+5:302021-08-22T04:32:21+5:30
अर्जुनी मोरगाव : प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता झाली पाहिजे. शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या, वीज, शिक्षण व आरोग्य ...
अर्जुनी मोरगाव : प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता झाली पाहिजे. शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या, वीज, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजांपासून कुणीही वंचित राहू नये. नगरीतील प्रत्येक प्रभागात काय उणिवा आहेत त्याचा विकास आराखडा तयार करून पाठवा. निधीसाठी आपण पाठपुरावा करू, अशा सूचना आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
स्थानिक नगरपंचायतने अग्निशमन वाहन तसेच दोन कचरा गाड्या खरेदी केल्या. या वाहनांचे शनिवारी (दि.२१) दुर्गा चौकात आमदार चंद्रिकापुरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव, प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव, माजी नगराध्यक्ष किशोर शहारे, पौर्णिमा शहारे, विजय कापगते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी नगरसेवक एसकुमार शहारे, प्रकाश उईके, ममता पवार, वंदना जांभुळकर, यमू ब्राह्मणकर, प्रज्ञा गणवीर, राकेश जायस्वाल, आर.के. जांभुळकर, एफ.आर.टी शहा, नरेश रंगारी, नाना शहारे उपस्थित होते. नगरपंचायत सभागृहात आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. शहर हे सुंदर व स्वच्छ असले पाहिजे. शहराचे सौंदर्यीकरण, हाॅयमास्ट लाइट, गटार नाल्या, सुंदर रस्ते, शुद्ध पेयजल व्यवस्था, आरोग्य या मूलभूत गरजा आवश्यक आहेत. सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावा, विकास कृती आराखडा तयार करून शासनाला सादर करा. निधीसाठी पाठपुरावा करू. निधीची कमतरता पडू देणार नाही. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे चंद्रिकापुरे यांनी सांगितले.
210821\img-20210821-wa0022.jpg
अग्निशमन वाहन व कचरा गाड्यांचे लोकार्पण करताना आ चंद्रिकापुरे