क्रीडा संमेलनातून उत्कृष्ट खेळाडू घडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 08:53 PM2017-09-07T20:53:03+5:302017-09-07T20:53:29+5:30
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे. दैनंदिन जीवनात अभ्यासासोबत काही वेळ खेळालाही द्यावा व आपले कौशल्य विकसित करावे. केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनातून उत्कृष्ट खेळाडू घडवावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ककोडी : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे. दैनंदिन जीवनात अभ्यासासोबत काही वेळ खेळालाही द्यावा व आपले कौशल्य विकसित करावे. केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनातून उत्कृष्ट खेळाडू घडवावे. पुढील काळात लवकरच सर्व शाळांना क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात येईल, असे प्रतिपादन देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांचे केंद्रस्तरीय क्रीडा संमेलन शासकीय आश्रमशाळा ककोडी येथे आयोजित करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करीत होते. उद्घाटन पं.स. सदस्य गणेश सोनबोईर यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी विजय टेंभुर्णीकर, क्रीडा समन्वयक प्रेमलाल कोरांडे, मेश्राम, गाते, डोवस, सरपंच रियाज खान, वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे, रावजी मुलेटी, नेतराम, डॉ. महेश जांभुळकर, सुनील कुंभरे, अमरदास सोनबोईर, रमेश शहारे, धमेंद्र जगणीत, यशवंत चव्हाण, गीता धावडे, रामेश्वर पदाम, उत्तम मरकाम, शाम पडोटी, राऊत, बारसागडे, कठाणे, मुख्याध्यापक शहारे, डॉ. मधुकर उफनकर उपस्थित होते.
या वेळी आगमन होताच पाहुण्यांना बॅचेस लावून स्वागत करण्यात आले. नंतर बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रांचे पूजन व क्रीडा ध्वज फडकावून क्रीडा सत्राचे उद्घाटन करण्यात आले.
प्रकल्प कार्यालयाकडून केंद्रस्तरीय क्रीडा संमेलन होणारे खेळ प्रदर्शनातून चांगल्या खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्यांच्या प्राविण्याची नोंद होईल व त्याला राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेता येईल, असे मार्गदर्शन मुख्याध्यापक एम.आर. शहारे यांनी केले. तसेच क्रीडा समन्वयक कोरोंडे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडेचे महत्व पटवून दिले व प्रकल्प कार्यालय देवरीकडून विद्यार्थ्यांना मिळणाºया सोयीसुविधांबद्दल माहिती दिली.
या वेळी परिसरातील ११ शाळांची उपस्थिती होती. ५९६ मुले-मुली, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. संचालन डोंगरे यांनी केले. बोडले यांनी आभार मानले.