संस्कारक्षम पिढी तयार करा
By admin | Published: January 18, 2017 01:28 AM2017-01-18T01:28:32+5:302017-01-18T01:28:32+5:30
आजची बालके देशाचे भवितव्य आहेत. शिक्षणाबरोबरच मुलांवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे,
उषा मेंढे : स्पर्धात्मक एकमंच सांस्कृतिक कार्यक्रम
साखरीटोला : आजची बालके देशाचे भवितव्य आहेत. शिक्षणाबरोबरच मुलांवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे, तेव्हाच देशात संस्कारक्षम पिढी तयार होईल व भारताचे भवितव्य उज्वल होईल, असे विचार जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी व्यक्त केले.
त्या साखरीपाठ बाबा मंदिरात मकरसंक्राती उत्सव मेळावा व शालेय स्पर्धात्मक एकमंच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
साखरीपाठ बाबा सेवा समितीच्या वतीने दोन दिवसीय कार्यक्रम घेण्यात आले. उद्घाटन जि.प. सदस्य लता दोनोडे यांच्या हस्ते, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. दीप प्रज्वलन जि.प. सदस्य दुर्गा तिराले, नगरसेवक यादवराव पंचमवार यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून सरपंच संगीता कुसराम, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, तहसीलदार प्रशांत सांगळे, प्रभाकर दोनोडे, रमेश चुटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चाटे, डॉ. देशमुख, देवराम चुटे, प्राचार्य सागर काटेखाये, समितीचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, मुख्याध्यापिका अजया कठाणे, प्रा. दखने, प्रा. भदाडे, श्यामलाल दोनोडे उपस्थित होते.
या वेळी बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमात श्री विद्या गर्ल्स हायस्कूल, बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालय, जि.प. हायस्कूल, जि.प. प्राथमिक शाळा, शांती निकेतन कॉन्व्हेंट, सक्सेस पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
दुसऱ्या दिवशी हळदीकुंकू, घोड्यांची शोभायात्रा, होमहवन, तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी माजी पं.स. सदस्य संगीता शहारे, बक्षीस वितरक म्हणून आ. संजय पुराम, सभापती हिरालाल फाफनवाडे, रमेश चुटे, वसुली अधिकारी शरद बावनथडे, सुनील अग्रवाल, डॉ. चाटे, मदनलाल अग्रवाल, शामलाल दोनोडे, मुकेश नागेंद्र, ललीत अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, संतोष बोहरे, प्रदीप चुटे, संदीप अग्रवाल, मनोज अग्रवाल, मुख्याध्यापिका डी.एफ. बघेले, संतोष उईके, प्रजापती, गोविंद बागडे उपस्थित होते.
यावेळी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व वस्तूच्या रुपात बक्षीस देण्यात आले. मंदिरात भक्तांना बसण्याकरिता एक चावडी तसेच रस्त्याचे बांधकाम आमदार निधीतून करण्याची हमी आ. संजय पुराम यांनी दिली.
प्रास्ताविक संतोष अग्रवाल यांनी मांडले. संचालन प्राचार्य सागर काटेखाये यांनी केले. आभार प्रा. सुनील वाघमारे यांनी मानले.(वार्ताहर)