दिव्यांगांचे रोष्टर तयारकरून अनुशेष भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:45+5:302021-08-20T04:32:45+5:30
गोंदिया : दिव्यागांचे ५ टक्केनुसार रोष्टर तयार करून अनुशेष भरण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी अपंग कल्याणकारी संघटनेच्या वतीने मंगळवारी ...
गोंदिया : दिव्यागांचे ५ टक्केनुसार रोष्टर तयार करून अनुशेष भरण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी अपंग कल्याणकारी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.१७) जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातून दिव्यागांचे ५ टक्केनुसार रोष्टर तयार करून अनुशेष भरा, दिव्यांगांची स्वतंत्र्य जनगणना करुन ऑनलाइन पोर्टल सुरू करा, दिव्यांगांना मोटराइज्ड ट्रायसिकल व व्यावसायिक साहित्य खरेदीसाठी वैयक्तिक व सामूहिक बचतगटासाठी आर्थिक साहाय्य मिळावे. शाळा नियंत्रण समिती, ५ टक्के नियंत्रण समिती व संजय गाधी निराधार योजना समिती गठित करून दिव्यांगांना प्रतिनिधत्व देणे, दिव्यांग प्रमाणपत्र १५ दिवसांत देण्यात यावे, बिज भांडवल, मुद्रालोन, जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत प्राधान्य कर्ज उपलब्ध करून देणे, निराधार योजनेचे अनुदान प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळावे, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग व इतर विभागांतील योजनांमध्येही ५ टक्केनुसार दिव्यांग लाभार्थींना लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष दिंगबर बन्सोड, सचिव दिनेश पटले, कोषाध्यक्ष आकाश मेश्राम, अर्जुनी-मोरगाव तालुकाध्यक्ष अशोक रामटेके, गोंदिया तालुका उपाध्यक्ष योगेश लिल्हारे, गोंदिया तालुका सचिव चंद्रशेखर कुंभरे, गोंदिया शहर संघटक सहेबाज शेख, गोरेगाव तालुकाप्रमुख आकाश धमगाये, गोरेगाव तालुका सचिव अशोक बिसेन, किशोर बावने व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.