संस्कारित व्यक्ती निर्माणातून परम वैभवशाली राष्ट्रनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:55 PM2017-10-07T23:55:39+5:302017-10-07T23:55:50+5:30
एक वैभवशाली राष्ट्र म्हणून भारताची ख्याती होती. मात्र संघटीत भाव नसल्याने मध्यकाळात परकीय आक्र मणाने देशाच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचे कार्य झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एक वैभवशाली राष्ट्र म्हणून भारताची ख्याती होती. मात्र संघटीत भाव नसल्याने मध्यकाळात परकीय आक्र मणाने देशाच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचे कार्य झाले. अशा विपरीत परिस्थितीत प.पु. डॉ. हेडगेवार यांनी पुन्हा परम वैभवशाली भारत निर्माण करण्याकरीता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना केली. संघाच्या शाखेतून संस्काराचे धडे देवून व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्मीतीचे अविरत कार्य संघ करीत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे विदर्भ प्रांत शारीरिक सहप्रमुख प्रशांत दाणी यांनी केले.
स्थानिक गणेशनगर परिसरातील जे.एम. हायस्कूलच्या प्रांगणात गोंदिया नगरच्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त आयोजित शस्त्रपूजन कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहूणे म्हणून गायत्री परिवारचे जिल्हा संयोजक येडे, भंडारा विभाग संघचालक दिनेशभाई पटेल, गोंदिया नगर संघचालक मिलींद अलोणी उपस्थित होते. दाणी म्हणाले, जगाच्या कानाकोपºयायात संघाच्या शाखा असून हजारो सेवा प्रकल्पातून लाखो स्वंयसेवक सेवा देत असून आजघडीला देशात आपण परिवर्तन पाहत आहोत. हे परिवर्तन राजकीय नसून राष्ट्रभावनेचे, समाजनिर्मीतीे आहे. भारत हा उत्सविप्रय देश असून या उत्सवाच्या माध्यमातूनच समाजाची संस्कृती व सभ्यता टिकूण आहे. अशात संस्कार हे घरातूनच प्राप्त होत असून पहिले संस्कार आईकडून मिळते जर शिवरायांची निर्मीती करायची असेल तर प्रत्येक आईला जिजाऊ होणे गरजे आहे. संघात भाषण दिले जात नाही तर कृतीतून संस्कार रुजविण्याचे कार्य केले जाते. समाजाला अजरामर करायचे असेल तर जागृत जनता केंद्राची निर्मीती करणे गरजेचे असून असे केंद्र संघ निर्माण करत आहे. येडे म्हणाले, भारताला मजूबत राष्ट्र करण्यासाठी पर्यावरण टिकवून ठेवण्याचे आवाहन करीत काही महात्म्यांनी देशाचे अवलोकन केले असता त्यांना राष्ट्र व संस्कृतीवर संकट दिसून आले. यातूनच संघाची स्थापना झाली. आपला भारत देश जगत गुरू होता, आज ही अवस्था का असा प्रश्न डॉ. हेडगेवार यांच्या समक्ष निर्माण झाला आणि त्यांनी देश निर्मीतीचा विडा उचलला. आज आपण सर्व सण, उत्सव साजरे करतो, त्यातून आपल्याला उर्जा मिळते. ही उर्जा देश विकासासाठी लावणे गरजेचे आहे. दरम्यान प्रौढ, तरूण स्वंयसेवकांनी योग, दंड, तर बाल स्वंयसेवकांनी नियुध्द व व्यायामाचे विविध प्रात्याक्षिक सादर केले. कार्यक्र माचे संचालन व आभार नगर कार्यवाह दलजीतसींग खालसा यांनी केले.शहरातील गणमान्य प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.